Site icon HW News Marathi

शिंदे सरकारच्या स्थापनेनंतर केल्या ‘या’ तीन महत्वाच्या घोषणा

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बहुमत चाचणीत विजयी मिळाला आहे. शिंदे सरकारने राज्यातील पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करणे, हिरकणी गाव वाचवण्यासाठी 21 कोटी रुपयांचा निधी आणि शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करणार, या तीन महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. शिंदे सरकार हे 164 मतांनी बहुमत चाचणी जिंकली आहे. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन प्रस्तावर मांडला. यावेळी एकनाथ शिंदेंची विधानसभेत मुख्यमंत्री म्हणून बोलण्याची ही पहिलीच वेळ आहे.

दरम्यान, रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी  21 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवर एक्साईज ड्युटी कमी करणार आहे. यामुळे राज्यातील जनतेला फायदा होणार असून येत्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेणार आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या पाहा, शिंदे सरकार हे येत्या काळात शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र व्हावा. यासाठी शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा निर्धार शिंदे सरकारने केला आहे.

संबंधित बातम्या
शिंदे सरकारने बहुमत चाचणीची अग्निपरीक्षा केली पास; तर महाविकास आघाडी फेल
Exit mobile version