Site icon HW News Marathi

उदय सामंत नॉट रिचेबल; शिंदे गटात सामील होण्यासाठी गुवाहाटीच्या दिशेने रवाना

मुंबई | राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे नॉट रिचेबल येत आहेत. सामंत हे काल (25 जून) नॉट रिचेबल येत असून  शिवसेना भवनात झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला उशाराने हजर आले होते. सामंत गुवाहाटीला गेल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. यामुळे शिवसेनेच एकच खळबळ माजली आहे.

दरम्यान, शिवसेना बंड पुकारलेल्या आमदारांना अपात्र करण्यासाठी कायदेशीर सल्ला घेण्यात येत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेतून मोठे मोठे नेते शिवसेनेचे नेते आणि बंडखोर नेता एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होण्यासाठी गुवाहाटीच्या दिशेने रवाना झाले आहे. शिंदे गटात सामील होणारे सामंत हे आठवे मंत्री आहेत. आता शिंदे गटात शिवसेनेचे 40 आमदार आणि अपक्ष 10 आमदार गेल्यामुळे त्यांचे संख्याबळ 50 च्या घरात गेले आहे.

सामंत हे रत्नागिरीचे आमदार असून कोकणातील दीपक केसरकर आधीच शिंदे गटात सामील झाले आहे. कोकणातील सेनेचे दोन दिग्गज नेते सेने गटात सामील झाले आहेत. कोकणातील अनिल परब यांच्या कामात हस्तक्षेप करत असल्यामुळे कोकणातील आमदार नाराज असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होत्या. आज सामंत शिंदे गटात गेल्यानंतर यावर शिक्कामोर्ताब झाला आहे.

 

Exit mobile version