HW News Marathi
राजकारण

‘या’ कारणामुळे अनिल परब ED चौकशीला गैरहजर

मुंबई | राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांना ईडीकडून समन्स बजावली होती. अनिल परब यांना दापोली येथील कथित बेकायदेशीर साई रिसॉर्ट प्रकरणी चौकशीसाठी आज (15 जून) समन्स पाठविला होता. परंतु, अनिल परब चौकशीसाठी ईडीसमोर हजर होणार नाही, अशी माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे. सध्या अनिल परब त्यांच्या पूर्वनियोजित शिर्डी दौऱ्यावर आहेत. साई दर्शनासाठी अनिल परब शिर्डीत दाखल झाले आहेत. यामुळे अनिल परब हे ईडीसमोर हजर होणार नाही. अनिल परबांचे वकिल ईडी कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. ईडीने २६ मे रोजी सकाळी अनिल परबांच्या यांच्या वांद्रे येथील खासगी आणि मरिन ड्राईव्ह शासकीय निवासस्थानी ‘अजिंक्यतारा’ येथे छापे मारले आहे. अनिल परब यांच्यासह त्यांच्या निकटवर्तींवर देखील ईडीने छापा टाकला होता.

 

 

तसेच अनिल परब यांच्या वांद्रे आणि शासकीय निवासस्थानासह मुंबई, पुणे आणि रत्नागिरी येथील सात ठिकाणी ईडी छापे टाकल्याची माहिती एएनआयने दिली होती. ईडीने अनिल परब यांच्या साडेतेरा तास चौकशी केल्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हणाले, “दापोली येथील साई रिसॉट माझ्यामालक सदानंद कदम आहेत. आणि ईडीने  बंद असलेल्या साई रिसॉर्टचे सांडपाणी समुद्रात जाते यावरून ईडीने चौकशी केली, अशी प्राथमिक माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. अनिल परब पुढे म्हणाले, “दापोली येथील साई रिसॉर्ट हे त्यांच्या मालकीचे नसून ते रिसॉर्ट बंद असून देखील ईडीने त्यांच्यावर कारवाई केली आहे. साडपाणी आणि मनी लॉड्रिंगचा काय संबंध असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला होता. आणि ईडीने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले असून यापुढे देखील त्यांना विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईल,” असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

दापोली येथे असलेले साई रिसॉर्ट एन एक्स व सी कोच हे अनधिकृत असल्याने 31 जानेवारी 2022 रोजी पर्यावरण मंत्रालय तोडण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार 90 दिवसांत हे रिसॉर्ड तोडण्याचे आदेश सांगितले होते. परंतु, या रिसॉर्टला 90 दिवस पूर्ण झाले असूनही हे रिसॉर्ट पाडण्यात आले नाही. आ रिसॉर्टमध्ये मनी लाँड्रिंगचा आरोप केला होता.

 

संबंधित बातम्या
बंद असलेल्या साई रिसॉर्टची ईडीकडून चौकशी; कारवाईनंतर अनिल परबांची माहिती
मनी लाँड्रिंग प्रकरणी शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्या खासगी आणि शासकीय निवासस्थानी EDची छापेमारी

 

Related posts

नातवाचा आजोबांकडे हट्ट, ‘साहेब’ निर्णयाचा पुर्नविचार करा !

News Desk

पाकिस्तानच्या दिवाळखोरीचा ‘हा’ पुरावा आहे !

News Desk

भास्कर जाधवांचा राजीनामा घेण्यासाठी विधानसभा अध्यक्ष मोटारसायकलवरून दाखल

News Desk