HW News Marathi
राजकारण

राज्याचा दुष्काळ दौरा हे माझे राजकीय लाँचिंग नाही !

मुंबई | “हा आमचा राजकीय दौरा नसून दुष्काळ पाहणी दौरा आहे. याद्वारे आम्ही लोकांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी अजूनही जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करत आहे. त्यामुळे हे काही माझे राजकीय लाँचिंग नाही”, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे. विधानसभा निवडणुका डोळ्यांपुढे ठेऊन रोहित पवार राज्यभर दौरे करत आहेत का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी हे विधान केले आहे.

राज्यातील लोकसभा निवडणुकांचे सर्व टप्पे पार पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याकडे आपले संपूर्ण लक्ष्य केंद्रीत केले आहे. शरद पवार हे सध्या राज्याच्या दुष्काळ दौऱ्यावर आहेत. दरम्यान, यावेळी शरद पवार यांच्यासोबत त्यांचे नातू रोहित पवार देखील दिसत आहेत. रोहित पवार हे यंदाच्या विधानसभा निवडणुका लढविणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे रोहित पवार हे याचसाठी राज्यभर दौरे करत आपले राजकीय लॉंचिंग करत आहेत का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेचा समारोप तर लोकसभेच्या प्रचाराला सुरुवात

News Desk

भाजपची शिवसेनेला ‘उपसभापती’ ची ऑफर

News Desk

यशस्वी राजकारणाचा आदर्श वस्तुपाठ घालून देणारा नेता म्हणजे एम. करुणानिधी | ठाकरे

News Desk