HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

कर्नाटकातील आमदारांच्या राजीनाम्यावर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा | सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली | कर्नाटकातील हाय व्होल्टेज ड्रामाला आता वेगळे वळण मिळाले आहे. कर्नाटकातील १५ बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. तसेच राजीनामा दिलेल्या आमदारांना कोणत्याही प्रकारचे विप लागू होणार नसल्याचे देखील न्यायालयाने म्हटले आहे. कर्नाटकातील राजकीय नाट्यावर आज (१७ जुलै) सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज सकाळी १०.३० वाजता हा निकाल दिला आहे.

या प्रकरणी मंगळवारी (१६ जुलै) न्यायालयात दोन्ही पक्षकारांनी आपली बाजू मांडली. त्यानंतर न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता. कर्नाटक विधीमंडळात एच.डी. कुमारस्वामी सरकारला गुरुवारी (१८ जुलै) बहुमत सिद्ध करण्यापूर्वी मोठा झटका असल्याचे म्हटले जाते. सर्वोच्च न्यायालयाने बंडखोर आमदारांनी विश्वासदर्शक ठरावात सामील व्हायलाच पाहिजे असे बंधन नसल्याचे सांगितले आहे.

 

Related posts

पोलिसांनी पुरेशी सुरक्षा व्यवस्था न पुरविल्यामुळे हे घडले !

News Desk

#DelhiVoilence : हिंसाचारातील मृतांचा आकडा २० वर, तर १८९ हून अधिक जण जखमी

अपर्णा गोतपागर

‘या’ महिनाअखेरीस मांडला जाणार राज्याचा अर्थसंकल्प

News Desk