HW News Marathi
राजकारण

सुशीलकुमार शिंदेंची उमेदवारी निश्चित, राहुल गांधी लवकरच सोलापूर दौऱ्यावर

नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी १३ फेब्रुवारीला सोलापूर दौऱ्यावर असणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची उमेदवारी निश्चित झाली असून त्यांनी आपल्या मतदारसंघातील अनेक गावांना भेटी देऊन प्रचाराला सुरुवात केली आहे. यंदा सोलापुरात मोदी लाट ओसरली असल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान सुशीलकुमार शिंदे यांनी जोरदार तयारी सुरु केली असून त्यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची जाहीर सभा घेण्याचे निश्चित झाले आहे.

राहुल गांधी १३ फेब्रुवारीला मुंबईत येतील. या दिवशी महाराष्ट्रात एकूण तीन कार्यक्रमांना राहुल गांधी उपस्थित राहतील. त्यातील एक कार्यक्रम सोलापूरमध्ये होणार आहे. काँग्रेसची महाराष्ट्रातील पहिली जाहीर सभा सोलापुरात घेण्यात येणार असून राहुल गांधींच्या सभेसाठी सोलापुरातील एकूण ४ मैदानांची पाहणी करण्यात आली आहे. यावेळी राहुल गांधींसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सार्वजनिक, घरगुती कार्यक्रमात शीतपेयऐवजी दूध द्या | नितीन गडकरी

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर अपघाताला पायलट जबाबदार

News Desk

शरद पवार यांची भाजप सरकारवर सडकून टीका

Gauri Tilekar