HW News Marathi
राजकारण

लोकसभेबरोबरच ४ राज्याच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा, जम्मू-काश्मीरवर सस्पेंस

नवी दिल्ली | निवडणूक आयोग आज (१० मार्च) सायंकाळी ५ वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकीची तारखा आणि वेळापत्रक जाहीर होणार आहे. या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणूक ७ ते ८ टप्प्यातील होणार असल्याची शक्यता वर्तविली आहे. त्याचबरोबर आंध्र प्रदेश, सिक्किम, ओडिसा आणि अरुणाचल प्रदेश या चार राज्यातील विधानसभा निवडणुकाची वेळापत्रक घोषणा होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

तसेच जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक लोकसभा निवडणुकीसोबतच होणार किंवा नाही याबाबत अद्याप स्पष्ट निर्णय झाला नाही. जम्मू-काश्मीर विधानसभा बरखास्त होऊन ६ महिन्यांच्या कालावधीत विधानसभा निवडणुका घोषित कराव्या लागणार आहे. येत्या मे महिन्यात हा कालावधी समाप्त होणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाला जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुका या लोकसभासोबतच घोषित होण्याची शक्यात वर्तविली जात आहे. परंतु भारत-पाक सीमेवरील वाढत्या तणावामुळे निर्माण झालेली सुरक्षेची स्थिती लक्षात घेऊनच हा निर्णय घेतला जाईल असे दिसते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री फडणवीस स्वर्गीय वसंतराव नाईक यांचाही रेकॉर्ड तोडतील !

News Desk

पार्थ पवार, रोहित पवार आगामी निवडणूक लढविणार नाहीत !

News Desk

“…त्यांच्या दृष्टींने संभाजी राजे हे स्त्री लंपट आणि व्यसनाधीन”, जितेंद्र आव्हाडांचे ट्वीट

Aprna