HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

त्यांची निष्ठा तपासा…नाहीतर ते आपल्याविरोधात काम करतील !

मुंबई | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अन्य पक्षांतून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांना प्रमाणात लक्षणीय वाढ झालेली आहे. त्यामुळे विरोधकांमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या इनकमिंगबद्दल आता भाजप नेत्यांना देखील चिंता वाटत असल्याचे चित्र आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी ही चिंता व्यक्त केली आहे. “भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची निष्ठा तपासा. नाहीतर भाजपमध्ये येतील आणि आपल्याविरोधात काम करतील”, अशी चिंता एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे.

“आपण सतर्क राहण्याची आवश्यकता आहे”, असेही एकनाथ खडसे यावेळी म्हणाले. “भाजपमध्ये नवीन लोकांची संख्या वाढते आहे. नव्या लोकांना संधी दिल्याने भविष्यात पक्षाचे महत्त्वही वाढणार आहे. मात्र, यापुढे माझी कोणतेही पद घेण्याची इच्छा नाही”, असे एकनाथ खडसे यांनी काहीच दिवसांपूर्वी म्हटले होते. भाजपमध्ये अन्य पक्षांतील नेत्यांच्या प्रवेशाचे प्रमाण वाढल्यानंतर एकनाथ खडसे यांनी यापूर्वी आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिला होता. एकनाथ खडसे यांनी “पक्षात आयात केलेल्या लोकांना संधी दिली जात आहे” असे म्हणत भाजपला घरचा आहेर दिला होता. तर आता मात्र खडसे यांनी या पक्षप्रवेशांबाबत चिंता व्यक्त केली आहे.

“पक्षवाढीसाठी अन्य पक्षातील नेत्यांनी आपण पक्षात येणे आवश्यक आहे. मात्र, अन्य पक्षांतून नेते, कार्यकर्ते आपल्या पक्षात आल्यानंतर आपण सतर्क राहणे गरजेचे आहे. अन्यथा भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही पूर्वीच्याच पक्षावर निष्ठा असेल तर आपल्या पक्षाचे नुकसान होईल”, असे मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे. त्याचप्रमाणे, जळगाव जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्वच्या सर्व जागा आपणच जिंकणार, असा विश्‍वासही एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला आहे.

Related posts

राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘संविधान बचाव, देश बचाव’ कार्यक्रम

Gauri Tilekar

युती शिवाय तयारीला लागा | मुख्यमंत्री

News Desk

पालघरमध्ये पैशांचा बाजार

News Desk