Site icon HW News Marathi

विरोधक असतानाही महाविकास आघाडीमध्ये समन्वय असायला व्हावा! – संजय राऊत

मुंबई | “विरोधक असतानाही महाविकास आघाडीमध्ये समन्वय असायला व्हावा”, असे विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. नाशिक पदवीधर निवडणूक ही बिनविरोध होणार नाही, असेही संजय राऊत यांनी आज (14 जानेवारी) माध्यमांशी बोलताना केले आहे. आणि या निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यांचा याबाबत मातोश्रीवर बैठक घेऊन चर्चा करू, असे संजय राऊत यावेळी म्हणाले.

 

संजय राऊत म्हणाले, “ज्या पद्धतीने सरकार चालविले, तोच समन्वय, तोच एकोपा हा विरोधी पक्षात काम करताना सुद्धा असायला हवा. तर आपण सर्व लढाया एकत्रितपणे लढू ही भूमिका आमच्या सगळ्यांची म्हणजे शिवसेनेची आहे. विधानपरिषद निवडणुकीमध्ये जो गोंधळ झाला तो झालेलाच आहे. तो तुम्ही नाकारू शकत नाही. काँग्रेस पक्षासंदर्भात ही घटना घडली असतील, तरी महाविकास आघाडी म्हणून त्याकडे लक्ष दिले पाहिजे. याचे कारण असे आहे. या पाच जागांच्या निवडणुकासंदर्भात ज्या पद्धतीने एकत्रित बसून भूमिका ठरविणे, चर्चा करणे व्हायाल हवे होते. ते दिसत नाही. मी कोणावर दोष देत नाही. नागपूरची जागा असेल, अमरावतीची जागा असेल यादोन्ही जागासंदर्भात काळजीपूर्व निर्णय घेणे गरजेचे आहे.”

 

नाशिक निवडणूक बिनविरोध होणार नाही    

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले, “मला असे वाटत नाही, वॉश आऊट वैगेरे काही होत नाही. या निवडणुका ज्या असतात, पण ही निवडणूक जी आहे. नाशिक पदवीधरची निवडणूक बिनविरोध होणार नाही. यासंदर्भात मातोश्रीवर बैठक आहे. आणि आम्ही सगळे मिळून महाविकास आघाडी म्हणून निर्णय घेऊ. निवडणूक बिनविरोध होणार नाही.”

संबंधित बातम्या

नाशिक पदवीधर निवडणुकीच्या दृष्टीने ‘मविआ’ निर्णय घेणार?

Exit mobile version