Site icon HW News Marathi

“चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची जागा शिवसेनेने लढावी”, संजय राऊतांचे विधान

मुंबई | “चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची जागा शिवसेनेने लढावी”, अशी माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पोटनिवडणुकीसंदर्भात केले आहे. पुण्याच्या कसबाच्या मुक्ता टिळक आणि चिंचवडचे लक्ष्मण जगताप या दोघांचे कॅन्सरने निधन झाले आहे. यामुळे कसबा आणि चिंचवड येथे पोटनिवडणूक 27 फेब्रुवारीला दोन्ही ठिकाणी मतदान होणार आहे. या दोन्ही ठिकाणच्या पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असे विधान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान केले होते. या विधानावर संजय राऊत यांनी आज (25 जानेवारी) माध्यमांशी बोलताना चिंचवड पोटनिवडणूक शिवसेना लढण्याची माहिती त्यांनी दिली.

कसबा आणि पिंपरी चिंचवडच्या विधानसभेच्या जागी विरोधकांनी परंपरा जपलेली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीचा दाखला दिला आहे, यावर संजय राऊत म्हणाले, “त्यांचे बरोबर आहे, परंपरा आहे. पण, अंधेरीची निवडणूक सुद्धा बिनविरोध झाली नाही, निवडणूक झाली. भाजप निवडणूक लढला नाही. पण, नांदेड आणि पंढरपूर या दोन्ही निवडणुका झाल्या. आणि दोन्ही ठिकाणी मृत आमदारांच्या घरातील जवळचे नातेवाई उभे होते. तरी त्या निवडणुका झाल्या. अंधेरीची पोटनिवडणूक हा अपवाद होता. ती मुंबईत निवडणूक होती. आणि भाजपला जिंकण्याची अजिबाद संधी नव्हती. तरीही काल रात्री अजित दादा पवार, जयंत पाटील, सुनील तटकरे हे सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते काल मातोश्रीवर आले होते. आम्ही सगळे बसलो होतो, आणि या दोन पोटनिवडणुका संदर्भात काय पावले टाकायची, कोणता निर्णय घ्याचा यासंदर्भात चर्चा झाली. उद्या परत, यासंदर्भात निर्णय घेऊ. पण, निवडणूक लढली, जर चिंचवडची जागा आहे. ती शिवसेनेने लढावी, असे आमचे सगळ्याचे मत आहे. पुण्याच्या कसबा  जागेबाबत  काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात निर्णय होईल. पण, इकडली जागाची आहे, लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेली आहे. तिथे शिवसेनेने ती जागा लढावी, अशा प्रकारची चर्चा आमच्यात झाली. यातून निर्णय होईल.”

 

Exit mobile version