Site icon HW News Marathi

“शेअर बाजाराचा हिशोब भाजपला द्यावा लागेल”, संजय राऊतांचा इशारा

मुंबई | “त्या पैशाचा हिशोब सरकारला द्यावा लागेल. तर शेअर बाजाराचा हिशेब भाजपला द्यावा लागेल”, असा इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. परंतु, या अर्थसंकल्पात मुंबईच्या अनेक मागण्या होत्या. पण, मुंबईच्या वाटेला अर्थसंकल्पात फक्त निराशा मिळाल्याने संजय राऊतांनी आज (2 फेब्रुवारी) माध्यमांशी बोलताना केंद्री सरकारवर टीका केली. तसेच “शेअर बाजाराचा हिशेब भाजपला द्यावा लागेल”, असे शेअर बाजार घसरणीवर बोलताना संजय राऊत यांनी निशाणा साधला.

सेन्सेक्स आणि एनएफी हे दोन्ही डाऊन आहेत, यावर पत्रकारांनी संजय राऊत यांना प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, “देशाची अर्थ व्यवस्था पूर्णपणे उद्धवस्थ करण्याचे भाजपने केलेले आहे. पूर्णपणे उद्धवस्थ, त्यामुळे स्टॉक एक्सचेंज आणि शेअर बाजार यावर जी देशाची अर्थव्यवस्था ठरविण्याचे काम जे सुरू आहे. त्याचा खर म्हणजे सर्व सामान्य जनतेशी काडीमात्र संबंध नाही. पण, समान्य जनतेचे पैसे हे अत्यंत विश्वासाने भारतीय आयुर्विमा (एलआयसी)मध्ये आणि स्टेस्ट बँक जी सरकारी बँक आहे. त्यामध्ये जे नोकरदारांचे पैसे आहेत. त्या पैशाचा हिशोब सरकारला द्यावा लागेल. शेअर बाजाराचा हिशेब भाजपला द्यावा लागेल.”

मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून

संजय राऊत म्हणाले, “औद्योगिक,आर्थिकदृष्ट्या अधपतन करण्याचे मोठे कारस्थान कालच्या बजेटमध्ये पुन्हा दिसून आले. मुंबईच्या संदर्भात स्पष्ट सांगायचे झाले तर प्रधानमंत्री अलीकडे वारंवार येईला लागले आहेत. केंद्रीय मंत्र्यांच्या टोल धाडी येत आहेत. उपमुख्यमंत्री मोठ मोठ्या घोषणा करत आहेत. पण, या सर्व घोषणा फक्त मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून होत आहेत. प्रधानमंत्री एका महिन्यात दोन वेळा मुंबईला येत आहेत. पण, येताना मुंबईसाठी काय आणत आहेत. काय देत आहेत, हा एक सहस्मय असा विषय आहे. मुंबई महानगर पालिका जिंकून. शिवसेनेची सत्ता घालवून, आणि भविष्यामध्ये ही मुंबई महाराष्ट्रातून वेगळी करू. महाराष्ट्राचे तुकडे करून जर कोणाला समाधान मिळणार असेल. तर मी स्पष्ट सांगतो की ते त्यांना शक्य नाही. जर या बजेटमध्ये मुंबईच्या अनेक मागण्या होत्या. अनेक खासदारांनी केलेल्या मागण्या होत्या,  तरी त्यांना ज्या प्रकारे वाटण्याच्या अक्षता दाखविण्यात आल्या. त्यावर आता न बोललेले बरे, पण नक्की आम्ही आवाज उठवित राहू.”

 

विरोधी पक्षाची बैठक

“विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या दालनामध्ये लोकसभा आणि राज्यसभेच्या नेत्यांची बैठक आहे. पुढील काय पावले उचलायला पाहिजे. कारण, गेल्या 50 वर्षामध्ये इतक्या मोठ्या प्रकारचा आर्थिक घोटाळा या देशात घडला नव्हता. आणि ज्या घोटाळ्यामध्ये सत्ताधारी पक्षाचा थेट संबंध आहे”, असेही संजय राऊत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना म्हणाले.

Exit mobile version