HW News Marathi
राजकारण

ठाकरे-पवारांच्या विमान प्रवासाची चर्चा

औरंगाबाद । आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाढत असलेल्या जवळीकमुळे राजकारणात चर्चा रंगू लागल्या आहेत. मनसेला आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही असल्याचे वृत्त सर्वांनाच माहिती आहे. दरम्यान, काल (२५ ऑक्टोबर)ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसेप्रमुख राज ठाकरे हे औरंगाबादहून एकाच विमानातून मुंबईकडे रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात तर्क वितर्कांना ऊत आला आहे.

शरद पवार माजी मंत्री भारत बोन्द्रे यांच्या नागरी सत्कारसाठी बुलडाणा येथे गेले होते. तर मनसेप्रमुख राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून विदर्भ दौऱ्यावर होते. तो दौरा आटोपल्यानंतर काल(गुरुवारी) राज ठाकरे औरंगाबाद येथे आले होते. दरम्यान, संध्याकाळी राज ठाकरे मुंबईकडे रवाना झाले. याच विमानातून शरद पवार सुद्धा प्रवास करत होते. शरद पवार आणि राज ठाकरे हे एकाच विमनातून प्रवास करत असल्याने त्यांच्या अचानक भेट ही निवळ योगायोग असला तरी यांच्या भेटीने ‘राज’कारण चांगलेच रंगू लागले आहे.

दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेने आपल्या उमेदवारींच्या चाचपणीला सुरुवात केली आहे. मनसेकडून ज्या मतदारसंघात २५ हजारांपेक्षा जास्त मतदान मिळाले, अशा ४० जागांवर विधानसभा निवडणूक लढवण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळेच, मनसेला आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी उत्सुक आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकसभेसाठी सेना-भाजपची युती होणार ?

News Desk

न्यायालयाच्या चपलेने राफेल आरोपाचा विंचू मारण्याचा प्रयत्न होतोय !

News Desk

शरद पवार योग्य बोलतात, त्यांचे घर पैशाने भरलेले !

News Desk