HW News Marathi
राजकारण

विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधक आणि सत्तांधारीमध्ये धक्काबुक्की; अमोल मिटकरींची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

मुंबई | पावसाळी अधिवेशनाचा (Monsoon Session) आज पाचवा दिवस आहे.  विधीमंडळाच्या (Legislature) पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्यावर धक्काबुक्की झाली. यामुळे काही वेळेसाठी विधीमंडळातील वातावरण तापले होते. अधिवेशन सुरू झाल्यानंतर आज (24 ऑगस्ट) पहिल्यांदा सत्ताधाऱ्यांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यास करत होते. त्यावेळी विरोधक ही आंदोलन केल्यासाठी विधीमंडळाच्या पायऱ्यावर पोहोचले. तेव्हा आधीच सत्ताधारी आंदोलन करत होते. तेथेच विरोधकांनी शिंदे सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात झाली. त्यावेळी सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्यानंतर त्यांच्या एकमेकांविरोध घोषणाबाजी करताना धक्काबुक्की झाली.

दरम्यान, सत्ताधाऱ्यांवी विधीमंडळाच्या पायऱ्यावर बॅनर घेऊन महाविकास आघाडी सरकारविरोधात आंदोलन करत होते. 50 खोके एकदम ओके, ‘कोविडच्या भीतने राजा बसला घरी…’ , ‘…हवालदार जनता फिरली दारोदारी’, महापालिका स्टँडिंग कमिटीचे खोके, मातोश्री ओके…’ लवासाचे खोके, सिल्व्हर ओके आणि बारामती ओके…’,  सत्ताधाऱ्यांनी मनपातील भ्रष्टाचाराविरोधात आणि  महाविकास आघाडी सरकार घोषणाबाजी देते होते.

सत्ताधारी घोषणा देत असताना विरोधक विधीमंडळाच्या पाऱ्यावर सरकारविरोधात आंदोलन देण्यासाठी पोहोचले होते. त्यावेळी विरोधकांनी फलक घेऊन सरकारविरोधात घोषणा देण्यासाठी पोहोचले होते. ‘खोके… रे… खोके एकदम ओके’ , ‘शेतकऱ्यांना सरकार देणार काय गाजरशिवाय दुसरे काय,’  ;गाजर देणे बंद करा…ओला दुष्काळ जाहीर करा…’, अशा घोषणाबाजी देत आंदोलन करत होते. त्यावेळी शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांना धक्का दिला. यानंतर मिटकरींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती माध्यमांशी दिली आहे.  मिटकरी म्हणाले, “आणि शिवीगाळ केली. यानंतर अमोल मिटकरी आणि महेश शिंदे एकमेकांमध्ये भिडले. यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुकी झाली. ”

 

 

 

 

Related posts

चंद्रकांत पाटलांनी दिले रामदास कदमांना तिळगूळ

News Desk

आमदार राणा यांच्याविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल !

News Desk

तुम्ही कोणीही सुनावणीसाठी लायक नाही !

News Desk