Site icon HW News Marathi

शिर्डी साईबाबा संस्थानाचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

मुंबई | प्रसिद्ध शिर्डी येथील  साई बाबा मंदिर विश्वस्त मंडळ (Sai Baba Temple Board) बरखास्त करण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाने (Aurangabad bench) दिला आहे. या व्यतिरिक्त येत्या दोन महिन्यात नव्याने विश्वस्त मंडळ नियुक्त करण्याच्या सूचना देखील खंडपीठाने दिल्या आहेत. खंडपीठाच्या आदेशामुळे महाविकास आघाडी विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का मानला जातो. कारण काँग्रेसशी चर्चा करून राष्ट्रवादी काँग्रेसने साईबाबा संस्थाचे विश्वस्त मंडळ आपल्या पदरात पाडून घेतले होते. परंतु, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. यामुळे साई बाबा मंदिर विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचा आजचा (13 सप्टेंबर) खंडपीठाचा निर्णय महत्वाचा मानला जातो.

तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने साईबाबा संस्थानवर 16 विश्वस्थानची नेमणूक केली होती. यात अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे नेमणूक केली असून आता काळेंना पद सोडावे लागणार आहे. परंतु, शिर्डीतील उत्तमराव शेळके यांनी संस्थांच्या विश्वस्त मंडळ नियमाला धरू नाही, असे म्हणत याचिका दाखल केली होती. या याचिकेवर खंडपीठाने सुनावणी पार पडली असून यात विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे आदेश खंडपीठाने केले दिले आहे.

या प्रकरणावर खंडपीठाकडे सुनावणी सुरू होती. यावर आज खंडपीठाने शिर्डी साईबाबा मंदिर संस्थानच्या विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे आदेश दिले. येत्या दोन महिन्यात नव्या विश्वस्त मंडळाची नेमणूक करण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत. साईबाबा मंदिर संस्थानच्या विश्वस्त मंडळावर राज्यभरातील 16 लोकांची निवडण्यात येते.

 

Exit mobile version