Site icon HW News Marathi

‘शिवाजी पार्क’बाबत मुंबई उच्च न्यायालयात आज होणार सुनावणी; निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

मुंबई | शिवसेनेच्या दसरा मेळावाच्या (Dasara Melava) याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) आज सुनावणी होणार आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मिळावे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणास्तव पालिकेने शिवसेनेला दसरा मेळाव्याची परवानगी नाकारली. यानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ वकील ऍस्पि चिनॉय यांनी मुद्यावर सुधारणा करण्याची संधी देण्यात यावी, यासाठी न्यायालयाने वेळ द्यावा, अशी विनंती शिवसेनेच्या वकिलांनी केली. यानंतर न्यायालयाने आज (22 सप्टेंबर) सुनावणी घेतली. या सुनावणीत न्यायालय दसरा मेळाव्यासाठी शिवजी पार्कसंदर्भात काय निर्णय देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

दरम्यान, पालिकेने न्यायालयात म्हटले की, सुधारणा करण्याऐवजी याचिका कर्त्यांनी एक स्वतंत्र याचिका दाखल करावी. म्हणजे त्या याचिकेला उत्तर देणे आम्हालाही सोपे जाईल. कारण आम्हाला त्या याचिकेची प्रत मिळणे आवश्यक आहे. यानंतर आम्ही आमचा युक्तीवाद तयार करू. यानंतर दोन्ही बाजूच्या वकीलांच्या वनंतीवरून आज दुपारी सुनावणी होणार होती. परंतु, काही वकीलांच्या अनुपस्थितीमुळे आज दुपारी होणारी 2.30 वाजता होणारी ही सुनावणी उद्या शुक्रवारीपर्यंत (23 सप्टेंबर) तहकूब करण्यात आली. या याचिकेवर उद्या सकाळी सुनावणी घेण्यात येईल. यानंतर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी देखील या प्रकरणी मध्यस्थी म्हणून याचिका दाखल केलेली आहे. शिंदे गटातर्फे ज्येष्ठ वकील जनक द्वारकादास यांनी न्यायालयाची परवानगी मागितल्यावर म्हटले की, या प्रकरणावर उद्या सुनावणी होताना आम्ही सर्व बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेऊन, असे न्यायालयाने म्हटले आहे.

संबंधित बातम्या

दसरा मेळाव्याच्या याचिकेवर उद्या दुपारी मुंबई उच्च न्यायालयात होणार सुनावणी

‘शिवाजी पार्क’वरील दसरा मेळाव्याच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आज होणार सुनावणी

 

 

Exit mobile version