Site icon HW News Marathi

दसरा मेळाव्याच्या याचिकेवर उद्या दुपारी मुंबई उच्च न्यायालयात होणार सुनावणी

मुंबई | शिवसेनेच्या दसरा मेळावा (Dasara Melava) परवानगीच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) उद्या सुनावणी होणार आहे. या याचिकेवर न्यायालयात आज (23 सप्टेंबर) दुपारी होणार आहे.  शिवसेनेच्या वतीने  ज्येष्ठ वकील ऍस्पि चिनॉय यांनी न्यायालयात आज होणारी सुनावणी उद्यापर्यंत (23 सप्टेंबर) तहकूब करण्याची विनंती केली. यानंतर न्यायालयाने उद्या होणाऱ्या सुनावणीदरम्यान आम्ही सर्व बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेऊ, असे न्यायालयाने म्हटले. यामुळे आत न्यायालयात उद्या काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणास्तव पालिकेने शिवसेनेची परवानगी नाकारली, असे शिवसेनेच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. या मुद्यावर सुधारणा  करण्याची संधी देण्यात यावी, यासाठी न्यायालयाने वेळ द्यावा, अशी विनंती केली. यानुसार न्यायालयाने शिवसेनाला उद्यापर्यंचा वेळ दिला आहे.

न्यायालयात नेमका काय युक्तीवाद झाला

शिवसेनेच्या वतीने ज्येष्ठ वकील ऍस्पि चिनॉय यांनी विनंती केली की, पालिकेने आमच्या विनंती अर्ज केलेला होता. त्याला उत्तर दिलेले आहे, आम्ही जोपर्यंत न्यायालयात याचिका दाखल केलेली होती. तोपर्यंत उत्तर आलेले नव्हते. परंतु, आता कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणास्तव आमची परवानगी पालिकेने नाकारली आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या याचिकेत या मुद्द्यावर सुधारणा देण्याची संधी देण्यात यावी. जेणे करून आम्ही नव्या मुद्द्यावर याचिकेत सुधारणा करून न्यायालयात स्वतंत्रपणे येऊ. परंतु, पालिकेच्या वतीने या सुधारणा करण्याच्या परवानगीला न्यायालयात विरोध करण्यात आला. पालिकेने न्यायालयात म्हटले की, सुधारणा करण्याऐवजी याचिका कर्त्यांनी एक स्वतंत्र याचिका दाखल करावी. म्हणजे त्या याचिकेला उत्तर देणे आम्हालाही सोपे जाईल. कारण आम्हाला त्या याचिकेची प्रत मिळणे आवश्यक आहे. यानंतर आम्ही आमचा युक्तीवाद तयार करू. यानंतर दोन्ही बाजूच्या वकीलांच्या वनंतीवरून आज दुपारी सुनावणी होणार होती. परंतु, काही वकीलांच्या अनुपस्थितीमुळे आज दुपारी होणारी 2.30 वाजता होणारी ही सुनावणी उद्या शुक्रवारीपर्यंत (23 सप्टेंबर) तहकूब करण्यात आली. या याचिकेवर उद्या सकाळी सुनावणी घेण्यात येईल. यानंतर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी देखील या प्रकरणी मध्यस्थी म्हणून याचिका दाखल केलेली आहे. शिंदे गटातर्फे ज्येष्ठ वकील जनक द्वारकादास यांनी न्यायालयाची परवानगी मागितल्यावर म्हटले की, या प्रकरणावर उद्या सुनावणी होताना आम्ही सर्व बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेऊन, असे न्यायालयाने म्हटले आहे.

 

Exit mobile version