Site icon HW News Marathi

शिवसेनेच्या ‘धनुष्यबाणा’वर शरद पवारांनी पहिल्यांदा दिली प्रतिक्रिया…

मुंबई | “स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापनेपासून स्वीकारले धनुष्यबाण हे चिन्ह आहे. एखाद्या राजकीय पक्षाचे चिन्हे काढून घेणे आणि यातून वादविवाद निर्माण करणे योग्य नाही “, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले आहे.  एकनाथ शिंदे यांनी पक्षासोबत बंडखोरी केली. यानंतर भाजपसोबत हात मिळवणी करत राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. यात एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आहेत.  शिंदे गट विरुद्ध ठाकरे यांचा वाद सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगापुढे सुरू आहे. दोन्ही गटाने न्यायालयात 5 याचिका दाखल केल्या आहेत.

शरद पवार म्हणाले, “धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह असून स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापनेपासून स्वीकारलेल्या हे चिन्ह आहे. यामुळे एखाद्या राजकीय पक्षाचे चिन्हे काढून घेणे आणि यातून वादविवाद निर्माण करणे योग्य नाही. जर एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना वेगळी भूमिका घ्याची असेल तर ते नक्कीच स्वत:चा वेगळा काढू शकतात.”

जेव्हा माझे काँग्रेससोबत मतभेद झाले होते. तेव्हा मी राष्ट्रवादी काँग्रेस हा वेगळा पक्ष काढला. आणि मी घड्याळ हे वेगळे चिन्हे घेतले. आम्ही काँग्रेसपासून वेगळे झाल्यानंतर पक्षांचे चिन्हे मागितले नाही आणि वाद वाढवला नाही. जर तुम्ही काही ना काही वाद करून वाद वाढवणार वाढविण्याची भूमिका कोणी घेत असेल तर लोक त्यांना पाठिंबा देणार नाही.”

 

 

 

 

Exit mobile version