Site icon HW News Marathi

विधानभवनाच्या परिसरात नितेश राणे-अबू आझमी ‘लव्ह जिहाद’च्या मुद्द्यावरुन आमने-सामने

मुंबई | राज्यात सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनासाठी भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (Abu Azmi) या दोघांमध्ये विधानभवनाच्या परिसरात खडाजंगी झाली आहे. या दोघांमध्ये लव्ह जिहादच्या (Love Jihad) मुद्द्यावरुन प्रसारमाध्यमांशी बोलताना वाद झाल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

नितेश राणे हे माध्यमांशी ग्रीन झोमध्ये मदरसा अनधिकृतपणे उभारले जात असल्याचा मुद्दा मांडला, अशी तक्रार करत होते. त्याचवेळी अबू आझमी त्यांच्याकडे आले. अबू आझमी म्हणाले, आमच्यावर कारवाईचे हत्यार उपासले जात असून तुम्ही माझ्यासोबत चला मी तुम्हाला दाखवितो, असे आव्हान त्यांनी केले.

अबू आझमी-नितेश राणे दोघांमध्ये नेमके काय झाले

यावर नितेश राणे म्हणाले, अबू आझमी हे कोणत्याही धर्माचे असले तरी अनधिकृत बांधकाम तोडले पाहिजे, असे मत त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. मी कधीही तुमच्यासोबत येऊ शकतो, हे खोटे असून माझे तुम्हाला आव्हान आहे, असे त्यांनी म्हटले. यानंतर नितेश राणेंनी लव्ह जिहादचा मुद्दा उपस्थित केला. याआधी तुम्हाला लव्ह जिहाद असते, हे मान्य करावे लागेल, असे मी तुम्हाला आव्हान आहे.” यानंतर अबू आझमी यावर म्हणाले, मी तुम्हाला खोटे आहे असून 50 ठिकाणी घेऊन जातो असे प्रत्युत्तर दिले आहे. तुम्ही प्रेमाची भाषा करतो. परंतु, तुम्ही हे इतरांनाही शिकवा, असे नितेश राणेंना अबू आझमी म्हणाले.

 

 

Exit mobile version