Site icon HW News Marathi

आज शिंदे सरकारच्या पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार; ‘या’ आमदारांना मंत्री पद मिळण्याची शक्यता

मुंबई। राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर तब्बल ३८ दिवसानंतर आज मंत्रिमंडळाच्या विस्तार (Cabinet Expansion) होणार आहे. शिंदे सरकारच्या आज (९ ऑगस्ट) पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून यात १८ ते २० आमदार मंत्री पदाची शपथ घेणार आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार हा आज सकाळी ११ वाजता राजभवनात होणार आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्र्यांनी शनिवारी-रविवारी दिल्ली दौरा केला झाला. या दौ-यात पक्षेश्रेष्ठींशी चर्चा केल्यानंतर काल मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची काल नंदनवन या निवासस्थानी चर्चा झाली. पहिल्या टप्प्यातील मंत्रिपदासाठी दोन्हीकडच्या आमदारांनी जोरदार फिल्डिंग लावली होती. शिंदे सरकारच्या मंत्री मंडळात नवीन आणि अनुभवी आमदारांना स्थापन मिळण्याची शक्यता वर्तवली आहे.
शिंदे गटातील हे मंत्री शपथ घेण्याची शक्यता

भाजपकडून हे मंत्री शपथ घेण्याची शक्यता

  • चंद्रकांत दादा पाटील
  • राधा कृष्ण विखे पाटील
  • सुधीर मुनंगटीवार
  • गिरिष महाजन
  •  सुरेश खाडे
  • अतुल सावे
  • मंगल प्रभात लोढा
  • रवींद्र चव्हाण
  • विजयकुमार गावित
Exit mobile version