HW News Marathi
राजकारण

प्रचारसभा या भजन करण्यासाठी नसतात !

लखनऊ | भाजपचे स्टार प्रचारक आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पुन्हा एकदा निवडणूक आयोगाने नोटीस पाठविली आहे. ७२ तासांच्या बंदीनंतरही योगी आदित्यनाथ यांनी वादग्रस्त विधाने करणे थांबविली नाहीत. निवडणुकांच्या प्रचारसभेत विरोधकांवर टीका करण्यासाठी आणि त्यांच्या चुका जनतेला दाखवण्यासाठी असतात. प्रचारसभा या भजन करण्यासाठी नसतात असे वादग्रस्त विधान योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.

तसेच महाआघाडीच्या एका उमेदवाराला ‘बाबर की औलाद’ असे म्हणाले. यामुळे आयोगाने त्यांना २४ तासांच्या आत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर आता ‘बाबर की औलाद’ असे वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. एएनआयला दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी हे वक्तव्य केले आहे. निवडणुकांच्या प्रचारसभेत केलेल्या वक्तव्यावरून योगी आदित्यनाथ चर्चेत आले आहेत. याआधी वादग्रस्त विधान केल्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांना ७२ तास प्रचार करण्यास बंदी घातली होती.

संभलमध्ये एका सभेदरम्यान आदित्यनाथ यांनी समाजवादी आणि बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराला उद्देशून बाबरची औलाद म्हटले होते. त्यांनी एका भाषणावेळी मुस्लिम लीगच्या झेंड्यांना व्हायरस म्हटले होते. तसेच भारतीय सैन्याला मोदींची सेना म्हटले होते.

योगी आदित्यनाथ यांचे वादग्रस्त वक्तव्य

देवबंद येथे सपा-बसपा आणि रालोदच्या पहिल्याच संयुक्त प्रचारसभेत ‘मी खास मुसलमान सभेदरम्यान मुस्लिम समुदायाला सपा-बसपा महाआघाडीलाच मतदान करण्याचे आवाहन केले होते. धर्माच्या नावावर मतदान मागण्याच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मायवतींवर कारवाई करण्यात आली आहे. तर योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांना ‘अली’ आवडतो तर आम्हाला ‘बजरंग’ बली आवडतो, असे विधान केले. या दोन्ही नेत्यांनी धर्माच्या नावावर मतदान करण्याचे आवाहन केल्यामुळे दोन्ही नेत्यांवर निवडणूक आयोगाकडून कारवाई करण्यात आली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काश्मीरमध्ये भाजपने ‘भगव्या’चा मोह सोडून ‘हिरवा’ रंग केला आपलासा 

News Desk

पंकजा मुंडेंच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडिओवर चंद्रशेखर बावनकुळे स्पष्टीकरण देत म्हणाले…

Aprna

“एकनाथ खडसेंच्या मुलाची हत्या की आत्महत्या?” गिरीश महाजनांचा सवाल; नेमके काय आहे प्रकरण

Aprna