Site icon HW News Marathi

निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला मिळाले ‘ढाल-तलावर’ चिन्ह

मुंबई | निवडणूक आयोगाने (Election Commission) शिंदे गटाला ‘ढाल-तलावर’ चिन्ह मिळाले आहे. शिंदे गटाने (Shinde Group) आज (11 ऑक्टोबर) सकाळी निवडणूक आयोगाला तळपता सूर्य ढाल-तलवार आणि पिंपळाचे झाड ही तीन चिन्ह पर्याय ई-मेलद्वारे सादर करण्यात होते. शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव निवडणूक आयोगाकडून समोवारी (10 ऑक्टोबर) मिळाले आहे. उद्धव ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने ‘मशाल’ समोवारी चिन्ह दिले आहे. तर ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असे नाव दिले आहे.

 

दरम्यान, निवडणूक आयोगाने ठाकरे गट आणि शिंदे गटाने त्रिशूळ चिन्हांची मागणी केली होती. परंतु, त्रिशूळ हे धार्मिक असल्यामुळे निवडणूक आयोगाने हे चिन्हचिन्ह दिले नाही. तर तामिळनाडूमधील डीएमके पक्षाचे उगवता सूर्य हे चिन्ह आहे. त्यामुळे हे चिन्ह देता येणार नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले होते. यानंतर निवडणूक आयोगाने शिंदे गटाला आज दुपारपर्यंत नवीन चिन्ह देण्याचे आदेश दिले होते. यानुसार, शिंदे गटाने आज सकाळी तीन नवे पर्याय ई-मेलद्वारे दिले होते. यानुसार, निवडणूक आयोगाने शिंदे गटाला ढाल-तलवार दिले आहे.

 

दसरा मेळाव्यात शिंदेंना 51 फुटी तलवार भेट

नुकत्याच शिंदे गटाचा दसरा मेळवा पार पडला. यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी 51 फुटी तलवार मेळाव्यात दिली होती. तेव्हा शिंदे गटा निवडणूक आयोगाकडे तलवारची मागणी करेल, अशा चर्चा तेव्हा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. यानंतर शिंदे गटाने आज अखेर निवडणूक आयोगाकडे पाठविलेल्या चिन्हात ढाल-तलवार पर्याय दिला आहे.

 

 

 

 

 

 

Exit mobile version