HW News Marathi
राजकारण

मुख्यमंत्र्यांनी राज्याला स्वतंत्र गृहमंत्री द्यावा | सुप्रिया सुळे

पुणे | राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सध्या राज्याचे गृहमंत्रीपद देखील आहे. मुख्यमंत्र्यांना गृहमंत्री पदाचा पदभार झेपत नसेल तर त्यांनी राज्याला स्वतंत्र गृहमंत्री द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे.

राज्यात महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. महिलांवरील प्रश्नांकडे मुख्यमंत्री गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप सुळे यांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी पक्षाच्या प्रचाराकड़े कमी लक्ष द्यावे आणि जनतेच्या समस्या पहाव्यात असा सल्ला देखील सुप्रिया सुळेंनी दिला .

दरम्यान, पूजा घालायच्या असतील तर त्या स्वत:च्या घरी घाला कारण महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. पूजा करण्याला आमचा विरोध नाही. पण अशा पूजा शैक्षणिक संकुलात नको. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात सत्यनारायणाच्या पूजेवरुन झालेल्या वादावर बोलताना त्यांनी हे विधान केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अन् शरद पवार म्हणतात, अभी तो मै जवान हूं !

News Desk

पर्रीकर यांना दिल्लीतच ठेवून गोव्यात नवी घडी निर्माण करता आली असती | ठाकरे

News Desk

राष्ट्रवादीच्या पुण्यातल्या सभेत भुजबळ रहाणार उपस्थित

News Desk