Site icon HW News Marathi

“मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वातील सरकार ओबीसींना त्यांच्या हक्कांचे आरक्षण देईल,” देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन

मुंबई |  “मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वातील सरकार ओबीसींना त्यांच्या हक्कांचे आरक्षण (OBC Reservation) देईल,” असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले आहे. उपमुख्यमंत्र्यांनी आज (7 ऑगस्ट) दिल्लीत राष्ट्रीय ओबीसी अधिवेशनात (National OBC Convention) बोलताना म्हणाले. माझ्या नागपूर मतदारसंघात ओबीसी सर्वाधिक असून ते मला निवडून देतात. यामुळे मी घडलो, असे फडणवीस यावेळी म्हणाले.

फडणवीस म्हणाले, “मी मुख्यमंत्री असताना स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची निर्मित केली होती. 2014 ते 2019 या कालावधीदरम्यान ओबीसीसंदर्भात 22 पैकी 21 निर्णय मुख्यमंत्री म्हणून घेतले होते. ते आपण पाहू शकता.” फडणवीस पुढे असेही म्हटले, “मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वातील सरकार ओबीसींच्या हक्कांचे रक्षण मिळेल,” असेही आश्वासन त्यांनी पुन्हा एकदा दिले.

ओबीसींसाठी विदेश शिष्यवृत्ती असेल, आयपीएस ट्रेनिंग, नोकरी, शिक्षण, हाॅस्टेल आणि आयएएस या सर्व मागण्या मान्य करून सरकार निर्णय जारी केल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.

 

Exit mobile version