Site icon HW News Marathi

पावसाळी अधिवेशनाच्या तारखेत बदल; ‘या’ तारखेला अधिवेशन होण्याची शक्यता

मुंबई | अखेर राज्याच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारचा (cabinet expansion) मुहूर्त ठरला आहे. राज्यात उद्या (9 ऑगस्ट) मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यानंतर राज्याच्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशनाच्या (monsoon session ) तारखेत बदलली आहे. यानुसार, 17 ते 23 ऑगस्टदरम्यान यंदाचे पावसाळी अधिवेशन होणार आहे, अशी नवी माहिती माध्यमांतून आली आहे. उद्या होणारी कामकाज सल्लागार समितीची बैठक पुढे ढकलली आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर लगेचच पावसाळी अधिवेशन (monsoon session maharashtra) होणार नाही.

दरम्यान, आज सकाळी तातडीची सचिवांची बैठक बोलवण्यात आली होती.  मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर लगेचच पावसाळी अधिवेशन होण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आज सकाळीच पावसाळी अधिवेशन १० ते १७ ऑगस्ट या काळात होण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु, यानंतर सायंकाळ होईलपर्यंत पावसाळी अधिवेशनाच्या तारखेत फेरबदल करण्यात आला. पावसाळी अधिवेशनाची तारीख 17 ते 23 ऑगस्टदरम्यान होणार आहे.

राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर त्या त्या खात्यांच्या मंत्र्यांना जबाबादारी स्वीकारावी लागणार आहे. आ नवनिर्वाचित मंत्र्यांना त्यांच्या खात्यांची जबाबदारी समजून घ्यावी लागणार आहे. कारण, शिंदे सरकारमधील बरेच नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. यामुळे उद्या कोण कोणते मंत्री शपथ घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

 

 

Exit mobile version