Site icon HW News Marathi

महाराष्ट्रातील सत्तांतरावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी; निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

नवी दिल्ली। राज्यातील सत्तांतरावर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आज सुनावणी होणार आहे.  न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय खंडपीठासमोर आज(३ ऑगस्ट) होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांवर अपात्रते, पक्षाचे गटनेते पदाची निवड, विधीमंडळाचे मुख्य प्रतोद पद, विधानसभा अध्यक्षांची निवड आणि बंडखोर आमदारांना सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी दिलेल्या आमंत्रणाविरोधात  प्रस्तावासंदर्भातील शिवसेने न्यायालयात याचिका आव्हान दिले असून या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.

दरम्यान, न्यायालयाने २५ जुलै रोजी झालेल्या सुनावणीत दोन्ही बाजूंना २७ जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करा, असे आदेश न्यायालयाने दिले होते. आणि गरज भासल्यास तर हे संपूर्ण प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे वर्ग करू, असे न्यायालयाने त्यावेळी म्हटले होते. शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंनी दोन्ही गटांच्या एकूण 5 याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकेवर न्यायालयाने 1 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार होती. परंतु, न्यायालयाने दोन्ही पक्षांना 3 ऑगस्ट म्हणजे आज सुनावणी होणार असल्याची सांगितले.

न्यायालयाचा निर्णय येत नाही, तोपर्यंत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदारांच्या अपात्रते संदर्भात कोणताही निर्णय घेता येणार नाही,  असे आदेश न्यायालयाने १२ जुलै रोजी दिले होते. शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचा दावा त्यांनी पहिल्या दिवसापासून केला आहे. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने दोन्ही बाजूला आपले म्हणणे मांडण्याचे आदेश दिले होते. यांविरोधात शिंदे गटाने शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाचा आहे. हे न्यायालयाला ठरवू द्या,  या प्रकरणाची सुनावणी स्थगित करणारी याचिका फेटाळून लावावी, अशी विनंती प्रतिज्ञापत्र केली आहे.

कोणत्या 5 याचिकेवर आज होणार सुनावणी
1) शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईविरोधात याचिका
2) शिंदे गटाचे प्रतोद गोगावले, गटनेते एकनाथ शिंदेंच्या मान्यतेविरोधात याचिका
3) एकनाथ शिंदे यांच्या शपथ विधी आणि विशेष अधिवेशनाविरोधात याचिका
4) राज्यपालांनी ठाकरे सरकारला विश्वासमताबाबत दिलेल्या निर्देशाविरोधातील याचिका
5) शिंदे गटाचे प्रतोद गोगावलेंच्या व्हीपचे शिवसेना आमदारांकडून उल्लंघन झाल्याविरोधात याचिका
Exit mobile version