Site icon HW News Marathi

ठाकरे गटाच्या ‘मशाल’ चिन्हाविरोधातील समता पक्षाची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली

मुंबई | दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) समता पक्षाची (Samata Party)  ‘मशाल’ चिन्हाविरोधातील याचिका फेटाळली. निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह दिले होते. न्यायालयाने मशाल चिन्हाविरोधातील याचिकेवर आज (19 ऑक्टोबर) पार पडली. आगामी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ठाकरे गटाला निवडणूक आयोगान दिलेले चिन्ह कायम राहणार आहे, असे म्हणत न्यायालयाने समता पक्षाची याचिका फेटाळून लावली.

जॉर्ज फर्नांडिस यांच्या समता पक्षाने ठाकरे गटाला दिलेल्या मशाल चिन्हावर आक्षेप घेतला होता. समता पक्षाने न्यायालयात दाखल केला याचिकेत ठाकरे गटाचे दिलेले मशाल हे चिन्ह रद्द करण्याची मागणी केली होती. या याचिकेवर न्यायालयाने समता पक्षाची याचिका फेटाळून लावली.

दरम्यान, निवडणूक आयोगाने शिवसेनेचं नाव आणि पक्ष चिन्ह गोठवले. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाला ‘मशाल’ चिन्ह देत ‘शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे’ असं नाव दिले. ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला चिन्हासाठी तीन पर्याय दिले होते. यात उगवता सुर्य, त्रिशूळ आणि मशाल हे तीन पर्याय चिन्हांसाठी दिले होते. यापैकी निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला ‘मशाल’ हे चिन्ह निवडणुकीसाठी दिले. यानंतर समता पक्षाने ठाकरे गटाला ‘मशाल’ चिन्हाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

 

 

Exit mobile version