Site icon HW News Marathi

गिरीश महाजनांवर सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी दिली पहिली प्रतिक्रिया

मुंबई | राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर सीबीआयने (CBI) गुन्हा नोंदविल्याची माहिती मिळाली आहे. महाजन यांच्यावर खंडणी गुन्हा जळगावमध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. जळगावमध्ये एका शैक्षणिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी यांनी महाजनांवर गुन्हा दाखल केला होता.

महाजनांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्याचे उपुमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली की, “सीबीआयने महाजनांवर कुठलाही गुन्हा दाखल केलेला नाही. मागच्या काळात सीआयडीकडे जो गुन्हा दाखल झाला होता. आम्ही ते सीबीआयकडे हस्तांतरीत केले आहे. या प्रकरमात मी एक पेन ड्राईव्ह दिला होता. त्या पेन ड्राइव्हमधअये कशाप्रकारे खोट्या केसेस दाखल करायचा खुलासा केला होता. या मागे सर्व समोर आले असून हे सर्व प्रकरण आता सीबीआयकडे गेले आहे.”

महाराष्ट्रातील सत्तांतरावरील सर्वोच्च न्यायातील सुनावणी संपली आहे. न्यायालयाने खरी शिवसेना कुणाची आणि शिवसेनेचा ‘धनुष्यबाण’ या पक्षचिन्ह कुणाला मिळणार, यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोग  निर्णय घेण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

 

 

Exit mobile version