HW News Marathi
राजकारण

संजय राऊत यांच्या निवासस्थानी ED चे पथक दाखल; ‘या’ प्रकरणी अटक होणार?

मुंबई। शिवसेनेचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) यांच्या निवासस्थानी ईडीचे पथक दाखल झाले आहे. राऊतांना पत्राचाळ प्रकरणी (Patra Chawl case) चौकशी सुरू आहे. या प्रकरणी राऊतांना चौकशीसाठी ईडीने तीन वेळा समन्स पाठवून ही ते गैरसमज राहिल्यामुळे ईडीने आज (३१ जुलै) त्यांच्या भांडूप येथील मैत्री निवासस्थानी ईडीने पथक दाखल झाले आहे. ईडी राऊतांची चौकशी करणार की अटक होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, ईडीने पथक राऊतांच्या निवासस्थानी दाखल झाल्यानंतर येथे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी राऊतांसह त्यांच्या पत्नीची देखील ईडी चौकशी करणार आहे. राऊतांच्या घरी ईडीचे पथक दाखल झाल्यानंतर त्यांनी ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये शिवसेनेचे चिन्ह असलेला फोटो ट्वीट केला आहे. आणि या फोटोला “तरीही शिवसेना सोडणार नाही… “, असे ट्वीट केले आहे. 

नेमके काय आहे प्रकरण

मुंबई येथील गोरेगावमध्ये पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि म्हाडाचा भूखंड आहे. यात राऊतांचे निटकवर्तीय प्रवीण राऊत यांची गुरु आशिष कन्स्टरक्शन कंपनीला या चाळचा विकास करण्याचे काम देण्यात आले होते. या चाळीच्या जागेचा काही भाग त्यांनी खासगी बिल्डरला विकल्याचाआरोप राऊतांवर केला आहे. प्रवीण राऊतांनी पत्राचाळीतील लोकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. प्रवीण राऊतांनी चाळतील 3 हाजार फ्लॅट बांधकाम सुरू होते. यापैकी 672 फ्लॅट चाळीतील लोकांना द्याचे होते. तर त्या व्यतिरिक्त म्हाडा आणि विकासक यांना वाटून घ्याचे होते. पण 2010 मध्ये प्रवीण राऊतांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 258 टक्के शेअर एचडीआयएल कंपनीला विकले. यानंतर पत्राचाळी भूखंड 2011, 2012 आणि 2013 अनेक खासगी बिल्डर्सना हस्तांतरित केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गृह मंत्रालयाने माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांची एसपीजी सुरक्षा हटविली

News Desk

अधिकारी माझे ऐकत नाहीत, गिरीश महाजन यांची तक्रार

News Desk

राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदी सचिन अहिर

News Desk