HW News Marathi
राजकारण

२१ मे ला विधान परिषदेच्या ६ जागांसाठी होणार निवडणूक

मुंबई | केंद्रीय निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक होणार असल्याची घोषणा केली आहे. २१ मे ला निवडणूक झाल्यानंतर २४ मे ला मतमोजणी होणार असल्यामुळे सध्या सर्वच राजकीय पक्षांनी आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी हालचाल करायला सुरुवात केली आहे. विषेश म्हणजे सत्तेत असलेल्या भाजप शिवसेनेसाठी ही निवडणुक अत्यंत महत्वपूर्ण समजली जात आहे.

विधान परिषदेच्या या जागांसाठी होणा-या निवडणूकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी करण्याबाबत दोन्ही पक्ष सकारात्मक असल्याची माहीती सुत्रांनी दिली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कोकण, नाशिक, परभणी आणि उस्मानाबाद लातूर या ठिकाणी जागापैंकी काही जागा मिळाव्यात अशी मागणी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनिकेत तटकरेंना उमेदवारी

News Desk

राहुल गांधींविरोधातील दुहेरी नागरिकत्वाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

News Desk

पालिकेच्या मराठी शाळेच्या मुद्यावरून अमित साटम यांची शिवसेनेवर टीका

Aprna