Site icon HW News Marathi

अंधारे आणि दानवेंनी घेतली राऊतांची भेट; तर अफजल खानच्या कबरीसंदर्भात बोलताना, म्हणाले…

मुंबई | “अफजल खानच्या कबरीजवळ असलेले अतिक्रमण हटवले ते चांगले झाले’, असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्य सरकारचे पुन्हा एकदा कौतुक केले. राऊत तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांशी भेटगाठी घेतल्या. या पार्श्वभूमीवर  ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अबादास दानवे यांनी आज (11 नोव्हेंबर) राऊतांची भेट घेतली. मुंबईच्या गोरेगावमधील कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी राऊतांना नुकताच जामीन मिळला आहे. राऊत हे तब्बल 100 दिवसांनी आर्थर रोड तुरुंगातून बाहेर आले आहेत. यावेळी राऊतांची मोठ्या जल्लोषात कार्यकर्त्यांनी स्वागत केले.

यावेळी राऊत म्हणाले, “आपलीच माणस कुटुंबातील माणस भेटायला येत आहेत. आम्ही 3 महिन्यानंतर भेटून चर्चा करत आहोत या भेटीमध्ये जास्त वेळ जात असल्याने वेळेचे गणित जमत नाही, त्यामुळे वेळ होतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. पुढे राऊतांना राज्य सरकारनी घेतलेल्या अफझलखानच्या जवळील अतिक्रमणाच्या अनधिकृत बांधकाम संदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारण्यास आला असता ते म्हणाले, “अफजल खानच्या कबरीजवळ असलेले अतिक्रमण हटवले ते चांगले झाले”, असे म्हणत त्यांनी सरकारचे कौतुक केले.

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राऊतांच्या भेटीगाठी

राऊतांनी गुरुवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.  राऊतांच्या स्वागतासाठी मातोश्रीच्या प्रवेशद्वारावर माजी मंत्री आणि युवा नेता आदित्य ठाकरे उभे होते. तर राऊत मातोश्रीत प्रवेश केल्यानंतर आदित्य ठाकरेंनी त्यांना मिठी मारून त्यांचे स्वागत करत आनंद व्यक्त केला.

 

Exit mobile version