HW News Marathi
राजकारण

फडणवीस सरकार ब्रिटिश मनोवृत्तीचे | मुंडे

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धुळे दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यावरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांच्या धुळे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात विषप्राशन करुन आत्महत्या करणाऱ्या शतकरी धर्मा पाटील यांची सखुबाई धर्मा पाटील आणि मुलगा नरेंद्र धर्मा पाटील प्रतिबंधात्मक कारवाईच्या नावाखाली ताब्यात घेण्यात आले होते. मुंडे ट्विट करून फडणवीस सरकार हे ब्रिटिश मनोवृत्तीचे असल्याचे म्हटले आहे.

मुंडे यांनी ट्विटर अकाऊंटवरुन फडणवीस सरकारचा खरपूस समाचार घेतला आहे. “मुख्यमंत्र्यांच्या दौ-यात अडथळा नको म्हणून मंत्रालयात आत्महत्या करणा-या धर्मा पाटील यांच्या वयोवृद्ध पत्नी आणि मुलाला अटक करणे म्हणजे, फडणवीस सरकारची ब्रिटिश मनोवृत्ती दाखवून देते.” हे ट्विट मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टॅग केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धुळे दौऱ्यावर येणार असल्याने दोंडाईचा पोलिसांनी मंत्रालयात विषप्राशन करुन आत्महत्या करणाऱ्या शेतकरी धर्मा पाटील यांच्या पत्नी आणि मुलाला प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून सकाळी सहा वाजेपासून विखरण येथून आणून पोलीस स्टेशनला बसवून ठेवले होते.

मुख्यमंत्री दुपारी दोंडाईचा येथून गेल्यानंतरसुद्धा नरेंद्र पाटील यांनी पोलीस स्टेशनमधून परत जाण्यास नकार दिला. पाटील म्हटले की, “मी २४ डिसेंबर रोजीच दोंडाईचा पोलिसांना लेखी लिहून दिले होते की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात आपण कोणत्याही गैरकायदेशीर मार्गाचा अवलंब करणार नाही. माझ्याकडून असे कोणत्याही प्रकारचे कृत्य होणार नाही. तरीही मला आणि माझ्या आईला सकाळी सहा वाजेपासून पोलीस स्टेशनला विनाकारण बसवून ठेवले. त्यामुळे आता स्वत: मंत्री पोलीस स्टेशनला येत नाही, तोपर्यंत आपण येथून जाणार नाही, अशी भूमिका नरेंद्र पाटील यांनी घेतली होती. तसेच आगामी काळात लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान अनेक मंत्री याठिकाणी येतील. तेव्हा दरवेळेस मला आणि माझ्या कुटुंबियांना अशापद्धतीने त्रास दिला जाईल का, असा सवाल नरेंद्र पाटील यांनी उपस्थित केला.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘बोले तैसा चाले’ असे झाले नाही तर लोक झोडपून काढतात !

News Desk

शिवतीर्थावर आज होणार मनसे ‘राज’गर्जना

News Desk

“मला आता भविष्याच्या लढाईची चिंता नाही”, अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Aprna