Site icon HW News Marathi

शिंदे-फडणवीस सरकारचे पहिले अधिवेशन; मोहित कंबोज यांच्या ट्वीटवर चर्चा होण्याची शक्यता

मुंबई | राज्याचे पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) आजपासून सुरू होणार आहे. राज्यात एकनाथ शिंदेंनी बंडखोरी करत भाजपशी हात मिळवणी करत सरकार स्थापन केले. यात एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले आहेत.  राज्यातील सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारचे हे पहिले अधिवेशन आहे. राज्यात अडीच वर्ष जे विरोधी बाकावर बसले होते. ते आता सत्ताधारी झाले असून सत्ताधारी विरोधक झाले आहे. यामुळे पावसाळी अधिवेशनकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागेल आहे.

पावसाळी अधिवेशनात ठाकरे गट आणि शिंदे गट पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत. या अधिवेशनात अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांना मदत, आरे कारशेडचा वाद, महाविकास आघाडी सरकारने घेतलेल सरकारच्या निर्णयांच्या स्थगितीचा मुद्दा, “राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा नेता लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना भेटणार आहे”, असे ट्वीट भाजप नेता मोहित कंबोज (Mohit Kamboj) आदी मुद्यांवर अधिवेशनात चर्चा सुरू होणार आहे.

मोहित कंबोज यांनी ट्वीटमध्ये नेमके काय म्हणाले

कंबोज यांनी तीन ट्वीट केले आहे. यात पहिल्या ट्वीटमध्ये कंबोज म्हटले, “हर हर महादेव ! अब तांडव होगा !” असे लिहिले. यानंतर दुसरे ट्वीट केले यात कंबोज म्हणाले, “1. अनिल देशमुख 2. नवाब मलिक 3. संजय पांडे 4. संजय राऊत 5_______माझे 100 टक्के खरे असते.” कंबोज यांनी तिसरे ट्वीटमध्ये म्हटले, “हे ट्विट सेव्ह करा: राष्ट्रवादीचा एक मोठा नेता नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांची लवकरच भेट घेणार!,” असे ट्वीट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक या दोघांना सध्या मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात आहेत.

संबंधित बातम्या

“राष्ट्रवादीचा एक मोठा नेता लवकरच देशमुख आणि मलिकांना भेटणार”, कंबोज यांचे खळबजनक ट्वीट

Exit mobile version