Site icon HW News Marathi

मुंबादेवीमध्ये मनसे पदाधिकाऱ्याची महिलेला केलेल्या मारहाणीनंतर पक्षाकडून पहिली प्रतिक्रिया

मुंबई | मुंबादेवीमध्ये (Mumbadevi) गणपतीच्या मंडप उभारणीवरून मनसे (MNS) पदाधिकाऱ्याने महिलेला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मारहाणीाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मनसे पदाधिकाऱ्याने महिलेच्या थोबाडी मारली आहे. महिलेला मारणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्याचे नाव विनोद अरगिले असून हा अरगिले हा मनसेचा उपविभाग प्रमुख आहे.

मुंबादेवी परिसरातीतल कामाठीपुरा गल्ली नंबर 8 मध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण झालेली घडना घडली होती. या महिलेने मेडिकल दुकानासमोर बॅनर लावू दिला नाही. यावेळी महिला आणि पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला  मनसे कार्यकर्त्यांनी ज्या ठिकाणी गणपती मंडप उभारला होता. त्या ठिकाणी महिलेने बॅनर लावू दिले नाही. त्यामुळे दोघांमध्ये मारहाण झाल्याची माहिती मिळाली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर नागपाडा पीएस येथे अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणावरून मनसेचे विभाग अध्यक्ष केशव मुळे यांनी प्रतिक्रिया देत म्हणाले, “मुंबादेवी परिसरातील कामाटीपुरा विभागात घडलेल्या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. आमचे पदाधिकारी मनसे उपाविभाग प्रमुख विनोद अरगिले आणि एका महिलेचा पक्षाचा बॅनर लावण्यावरून वाद झालेला. त्यामुळे जो काही प्रकार घडला. परंतु, या घटनेमागची पार्श्वभूमी काय आहे. मनसेचा बॅनर लागत होता. ती महिला तेथे अडथळा निर्माण करत होती. ही महिला बेकायदेशीर फेरीवाले याठिकाणी बसविते आणि त्यांच्याकडून महिन्याला पैसे घेते. परंतु, हा प्रकार घडण्यामागे त्या महिलेने गणपतीचा मंडपचा खंब हलविण्याचा प्रयत्न केला. जर तो खंब पडला असता तर अनेक लोक त्या ठिकाणी जखमी झाले असते. मनसेच्या पदाधिकाऱ्याकडून अनावधानाने हा प्रकार घडला आहे. या प्रकरणाचे आम्ही समर्थन करत नाही. परंतु, लोकांपर्यंत खरी बातमी पोहोचावी हाच खरा उद्देश आहे.”

 

 

 

 

 

Exit mobile version