Site icon HW News Marathi

गुजरात विधानसभा निवडणुकीचे बिगुज वाजले; 1 आणि 5 डिसेंबरला दोन टप्प्यात मतदान होणार

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून बहुप्रतीक्षित असलेल्या गुजरातच्या 15 व्या विधानसभा निवडणुकीच्या (gujarat assembly election 2022) तारखांकडे सर्वांचे लक्ष लागेल होते. अखेर आज प्रतिक्षा  केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) आज (3 नोव्हेंबर) अखेर गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. गुजरात विधानसभा निवडणूक ही दोन टप्प्यात करण्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेतून केली. यानुसार, गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी पहिला टप्प्याचे मतदान 1 डिसेंबर रोजी तर दुसऱ्या टप्प्यासाठी 5 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तसेच गुजरात विधानसभा आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवणुकांची मतमोजणी ही एकाच दिवशी म्हणजे 8 डिसेंबर रोजी होणार आहे.

गुजरात विधानसभेच्या 182 जागेसाठी निवडणुका होणार आहे. गुजरात विधानसभेच्या पहिल्या टप्प्यात 89 जागांवर मतदान होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात 93 जागांसाठी मतदान होणार आहे. केंद्रीय निवडणुक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, “गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत यंदा 4.9 कोटी मतदार मतदान करणार आहेत. तर 4.61 लाख हे  युवा मतदार आहेत. महिलांसाठी 1 हजार 274 मतदान केंद्र आणि दिव्यांगासाठी 182 खास मतदान केंद्र उभारण्यात आलेली आहेत. तसेच गुजरात विधानसभा निवडणुकीत 3. 24 लाख मतदार पहिल्यांदा मतदान करणार आहेत. तर 50 टक्के मतदान केंद्राचे लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे,” अशी माहिती केंद्री निवडणूक आयोगाने  दिली आहे.

संबंधित बातम्या

केंद्रीय निवडणूक आयोग आज गुजरात विधानसभा निवडणुकीची करणार घोषणा

 

 

 

Exit mobile version