Site icon HW News Marathi

राज्यातील सत्तांतरावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू; संपूर्ण देशाचे लक्ष

मुंबई | राज्यात सत्तांतरवर आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी सुरू आहे. राज्याचे सत्तांतर प्रकरण सात सदस्यीय घटनापीठाकडे स्थापन करण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे. यामुळे सर्वोच्च न्यायालयात आज (14 फेब्रुवारी ) पहिल्या क्रमांकावर राज्याच्या सत्तांतर प्रकरण आहे. यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गट या दोघांनी शिवसेना नाव आणि धन्युष्यबाण पक्षाचे चिन्ह काय निर्णय येणार याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

यापूर्वी राज्यातील सत्तांतर प्रकरणावर 10 जानेवारी रोजी सुनावणी झाली. यावेळी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी संत्तातर प्रकरणाची सुनावणी 7 सदस्यीय घटनापीठाकडे पाठविण्याची मागणी केली होती. यावर सर्वोच्च न्यायालय काय चर्चा किंवा निर्णय घेईल, हे महत्वाचे आहे. हे प्रकरण सदस्या पाच सदस्यीय घटनापिठासमोर होणार आहे, ज्यामध्ये सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड, न्या. एम.आर. शहा, न्या.कृष्ण मुरारी, न्या. हिमा कोहली आणि न्या. पी. एस नार्सिंमा यांचा समावेश आहे.

न्यायालयात या मुद्द्यांवर होणार चर्चा
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटाचे 16 आमदारांचा अपात्रतेचा मुद्दा, राज्यघटनेच्या अनुसूची 10 मधील तरतुदींची व्यप्ती, राज्यपालांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांना दिलेले निमंत्रण, विधानसभा अध्यक्षांची निवड आणि विधानसभेतील शिवसेनेच्या मुख्य प्रतोदाची निवड या मुद्यांवर सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद होईल.

 

संबंधित बातम्या

राज्यातील सत्तांतर प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे सर्वोच्च न्यायालय पाठविणार? सर्वांचे लक्ष

 

 

Exit mobile version