Site icon HW News Marathi

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर 17 ऑक्टोबरला होणार सुनावणी

मुंबई | पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी (Patra Chawl land scam case) शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी 17 ऑक्टोबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.  यामुळे राऊतांचा तुरुंगातील मुक्काम 17 ऑक्टोबरपर्यंत वाढला आहे. राऊतांची आज (10 ऑक्टोबर) न्यायालयीन कोठडी संपली आहे. राऊतांच्या जामीन अर्जावर ईडीच्या पीएमएलए न्यायालयात सुनावणी सुरू होती.  सध्या राऊत हे आर्थर रोड कारागृहात मुक्कामी आहेत.

 

दरम्यान, राऊतांना पोलीस न्यायालयात घेऊन जात असताना त्यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी राऊतांनी निवडणूक आयोगाने चिन्ह गोठावल्यावर पहिली प्रतिक्रिया दिली. राऊत म्हणाले, “आमच्या पक्षाचे नवीन चिन्ह क्रांती घडवून आणेल. भविष्यात शिवसेना अधिक सक्षम होईल. कारण आमच्या शिवसेनेचे स्पिरी आणि शिवसेनेचे रक्त आहे. म्हणून पक्षाचे चिन्ह गोठवल्याने आमच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. उलट आम्ही आणखी जोमाने आम्ही पुढे काम करू. पक्षाला लोकांपर्यंत नेऊ आणि पक्षाच्या नवीन चिन्ह आणि पक्षाच्या नावाला लोकांपर्यंत पोहोचवू.” राऊत पुढे बोलताना पक्षाची गोठवलेल्यांचे उदाहरण देत म्हणाले, ” जन संघ आणि काँग्रेस यांच्यावरही चिन्ह गोठवण्याची वेळ आली होती. पण ते पक्ष संपले नाही तर उलट आणखी जोमाने आणि ऊर्जेने कार्यकर्ते काम करायला लागले. हे पक्ष आणखी वाढले आणि मोठे झाले. असेच बळ आमच्या कार्यकर्त्यांना देखील मिळेल”,  असे ते माध्यमांशी बोलताना म्हणाले.

 

ईडीने राऊतांना गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी त्यांच्या भांडूप येथील निवासस्थानी 31 जुलै रोजी सकाळी ईडीन छापा टाकला. यानंतर राऊतांनी 9 तासांची चौकशी केल्यानंतर ईडी त्यांना ताब्यात केली. यानंतर ईडी कार्यालयात देखील राऊतांची 7 तासांची चौकशी केल्यानंतर ईडीने 31 जुलै रोजी मध्य रात्री अटक केली. यापूर्वी राऊतांना 19 सप्टेंबरला न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी राऊतांची ईडी कोठडी 4 ऑक्टोबरपर्यंत वाढवली होती. दरम्यान, ईडीने राऊतांविरोधात पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी 16 सप्टेंबर रोजी आरोपपत्र दाखल केले होते. यापूर्वी राऊतांना 5 सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर केले होते. तेव्हा न्यायालयाने राऊतांना 19 सप्टेंबरपर्यंत सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यानंतर राऊतांची न्यायालयीन कोठडी आज संपली आहे. याआधी राऊतांना २२ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने राऊतांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

नेमके काय आहे प्रकरण

 

मुंबई येथील गोरेगावमध्ये पत्राचाळीत म्हाडाचा भूखंड आहे. यात राऊतांचे निटकवर्तीय प्रवीण राऊत यांची गुरु आशिष कन्स्टरक्शन कंपनीला या चाळचा विकास करण्याचे काम देण्यात आले होते. या चाळीच्या जागेचा काही भाग त्यांनी खासगी बिल्डरला विकल्याचाआरोप राऊतांवर केला आहे. प्रवीण राऊतांनी पत्राचाळीतील लोकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. प्रवीण राऊतांनी चाळतील 3 हाजार फ्लॅट बांधकाम सुरू होते. यापैकी 672 फ्लॅट चाळीतील लोकांना द्याचे होते. तर त्या व्यतिरिक्त म्हाडा आणि विकासक यांना वाटून घ्याचे होते. पण 2010 मध्ये प्रवीण राऊतांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 258 टक्के शेअर एचडीआयएल कंपनीला विकले. यानंतर पत्राचाळी भूखंड 2011, 2012 आणि 2013 अनेक खासगी बिल्डर्सना हस्तांतरित केला.

 

संबंधित बातम्या

“आमच्यात शिवसेनेचे ‘स्पिरीट’,” निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवल्यानंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया

 

Exit mobile version