HW Marathi
देश / विदेश राजकारण

कोलकाता पोलिसांनी दोन सीबीआय अधिकाऱ्यांच्या ठिकाणांवर मारले छापे

नवी दिल्ली | पश्चिम बंगालमध्ये सीबीआय विरोधात पोलीस यांच्यामधील तणाव कमी होण्याचे चिन्हा दिसत नाही. कोलकाता पोलीस आयुक्त राजीव कुमार चौकशीसाठी शिलाँगला दाखल झालेले असताना पोलिसांनी सीबीआयच्या दोन महत्वाच्या अधिकाऱ्यांशी संबंधित ठिकाणांवर छापे मारले आहेत.

कोलकाता पोलिसांनी  माजी अंतरिम संचालक एम. नागेश्वर राव यांच्या पत्नीच्या कंपनी आणि घरावर आज (८फेब्रवारी) धाड टाकली आहे.  नागेश्वर राव यांच्या पत्नीची अँजेलिना मर्कंटाईल प्रा. लि. नावाची सॉल्ट लेक येथे कंपनी आहे. कोलकाता पोलिसांच्या या छाप्यामुळे उद्या (९ फेब्रुवारी) होणाऱ्या राजीव कुमार यांच्या चौकशीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रत्युत्तर देताना पत्रकार परिषदेमध्ये मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. निवडणुका आल्या की “मोदी चायवाले बनतात आणि संपल्याकी राफेलवाले बनतात,” अशी शब्दात मोदींवर ममता यांनी टीका केली.

 

Related posts

अखेर धर्म संसदेने निश्चित केली राम मंदिर निर्माणाची तारीख

News Desk

लडाखमधील हिमस्खलनात १० जण अडकले, लष्कराकडून बचावकार्य सुरू

News Desk

सचिन तेंडुलकरचा पॉलिटीकल मास्टरक्लास

News Desk