Site icon HW News Marathi

‘धनुष्यबाणा’चे चिन्हा गोठवा; सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाच्या वकीलाने केली मागणी

मुंबई | शिंदे गटाने निवडणूक चिन्हासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगासमोरील (election commission of india) सुनाणीला स्थगिती देऊ नका, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात (supreme court of india) केली होती. या पार्श्वभूमीवर  सरन्यायाधीश उदय लळित यांनी काल (6 सप्टेंबर) तातडीने सुनावणी घेण्याचे आदेश दिले. यानुसार, न्यायालयात आज (7 सप्टेंबर) सकाळी 10. 30 वाजता सुनावणी पार पडली. यानंतर न्यायालयाने 27 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली असून 27 सप्टेंबरला न्यायालय दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकणार आहे.

दरम्यान, धनुष्यबाण चिन्हा गोठवण्याची मागणी शिंदे गटाचे वकील कौल यांनी घटनापीठाकडे केली. राज्यातील आगामी महापनगर पालिका निवडणूक आणि पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी वकीलाने केली. शिंदे गटाने बंडखोरी केल्यापासून शिवसेना आणि धनुष्यबाणावर दावा केला आहे. यानंतर पहिल्यांदाच शिंदे गटाने धनुष्यबाणचे चिन्हा गोठवा, अशी मागणी केल्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळा चर्चेला उधाण आले आहे.

शिंदे गटाने चिन्हा गोठवण्याच्या मागणी केल्यावर न्यायालयाने कोणतेही मत व्यक्त केले नाही. परंतु, ठाकरे गटाच्या वकील सिंघवींनी आधी शिंदे गटाच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय घ्या, असा प्रतिवाद न्यायालयात मांडला. निवडणूक आयोगाकडे दाद मागणारे शिंदे गट अपात्र ठरू शकतात, असे ठाकरे गटाचे वकील सिंघवींनी न्यायालयात म्हटले. यावर निवडणूक आयोगाचे वकील अरविंद दातार म्हणाले, “निवडणूक चिन्हासंदर्भात आमच्याकडे धनुष्यबाणचे प्रकरण घेऊन येतील. त्यावेळी धनुष्यबाणावर निर्णय घेणे बंधनकारक आहे. शिंदे गाटातील आमदार अपात्र ठरले तरी ते केवळ विधीमंडळातून अपात्र ठकरतील, राजकीय पक्षातून नाही,” असे ते म्हटले.

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील सत्तांतरावरील पुढील सुनावणी 27 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली

 

 

 

Exit mobile version