HW News Marathi
राजकारण

‘गद्दारी’ करणारे पक्ष सोडून गेल्यामुळे काँग्रेसकडून ‘लाडू वाटप’

मुंबई | राष्ट्रवादीच्या नेत्यांसह काँग्रेसचे नायगावचे आमदार कालीदास कोळंबकर यांनी आज (३१ जुलै) भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कोळंबकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. “पक्षांतर केलेल्या नेत्यांवर नाराज होण्याव्यतिरिक्त त्यांच्यावर लाडू वाटून आनंद व्यक्त केला जात आहे. पक्षाशी गद्दारी करुन गेलेल्या कालीदास कोळंबकरांना नायगावची जनता धडा शिकवेल असा टोला राजू वाघमारे यांनी लगावला.”

काँग्रेसने मुंबई येथील टिळक भवन येथे आज ‘लाडू वाटपाचा’ कार्यक्रम आयोजित केला होता. पक्षांतर केलेल्या नेत्यांवर नाराज होण्याव्यतिरिक्त त्यांच्यावर लाडू वाटून आनंद व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्र काँग्रेसने आनंद साजर करतानाचा व्हिडिओ ट्विट केला आहे. “कॉंग्रेसच्या विचारधारेवर व पक्ष नेतृत्वावर सामान्य कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. पक्षात कोणतेही दुःखाचे वातावरण नसून उलट संधीसाधू व स्वार्थी मंडळी पक्षाशी गद्दारी करून गेल्यामुळे आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे,” अशी पोस्ट शेअर केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारतीय जवानांच्या फोटोचा कोणत्याही राजकीय पक्षांनी वापर करून नये | निवडणूक आयोग

News Desk

“नवनीत राणा ‘सी’ ग्रेड फिल्म करणाऱ्या, एक आमदार भाळला आणि…”; शिवसेनेने फटकारले

Manasi Devkar

नाणार प्रकल्पग्रस्तांनी घेतली राज ठाकरेंची भेट

News Desk