Site icon HW News Marathi

“पुढचे अडीच वर्ष ‘मविआ’ सरकार पूर्ण करेल”, संजय राऊतांचा विश्वास

मुंबई | “पुढचे अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकार पूर्ण करेल,” अशा विश्वास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. मी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीला वंदन करू तुम्हाला सांगतो की, हम हार माननेवाले नही, आम्ही जिंकणार, असे आवाहन राऊतांनी बंड पुकारले शिवसेना नेता आणि त्यांच्या गटाला दिले आहे. राऊतांनी आज (24 जून) यशवंत राव चव्हाण सेंटरमध्ये माध्यमांशी बोलताना म्हणाले.

या इमारतीतून महाविकास आघाडीच्या युतीची घोषणा झाली, यासंदर्भात पत्रकारांच्या प्रश्नावर राऊत म्हणाले, “आणि या इमारतीतून मी तुम्हाला सांग आहे. महाविकास आघाडी मजबूत आहे. आणि महाविकास आघाडीचे सरकार पुढील राहिलेली अडीच वर्ष पूर्ण करेल. आणि पुन्हा सत्तेत येईल, जे गेलेत गृहमंत्री राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आहेत. गृहमंत्री सभागृहाचे स्पीकर पण राहिलेले आहे. आमची सुभाष देशाई आणि माझी काही कायदेशी गोष्टीसदर्भात चर्चा देखील झाली. मला वाटते जे आम्हाला करायचे आहे. ते आम्ही केलेले आहे.”

फ्लोर ऑफ द हाउस जिंकणार, आणि रस्त्यावरची लढाई पण जिंकणार

राऊत म्हणाले, “मी तुम्हाला यशवंत राव चव्हाण यांच्या साक्षीने आणि बाळासाहेब ठाकरे बरे का, याचे मी नाव घेऊ सांगतो त्यांच्या स्मृतीला मी वंदन करून सांगतो. हम हार माननेवाले नही, आम्ही जिंकणार, फ्लोर ऑफ द हाउस जिंकणार, आणि रस्त्यावरची लढाई झाली तर तेथेही आम्हीच जिंकणार ज्यांना आमचा सामना करायचा आहे. ते मुंबईला येवू शकतात. या लोकांनी खूप चुकीचे पाऊल उचलले आहे. आम्ही त्यांना परत येण्याची संधी पक्ष दिली. आता मला वाटते, वेळ निघून घेलेली आहे. आम्ही आता शरद पवार यांच्यासोबत बसलो होते. यावेळी सुभाष देसाई आणि दिलीप वळसे पाटील पण होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत पण चर्चा झाली. पण पूर्ण तयारी, तुम्ही या आता आमचे चॅलेंज आहे.”

शिंदे गटाला दिलेले अल्टीमेट संपले

“शरद पवार हे देशातील राजनितीचे सर्वात मोठे नेते आहेत. मी तर त्यांना भीष्म पितामह बोलतो, पवारसाहेब आणि मुख्यमंत्र्यांचे निर्तर सवाद चालू असतो. जे अल्टीमेंट दिले आहे आहे, पत्रकारांनी प्रश्न विचारले, त्यावर राऊत म्हणाले, ” अल्टीमेटम संपले, तुम्हा या. आता फॉर ऑफ द हाऊस बोलू.”

संबंधित बातम्या
“मविआ’चा प्रयोग फसला म्हणणे म्हणजे राजकीय अज्ञान”, शरद पवारांचा विरोधकांना टोला
शिवसेनेने ‘मविआ’मधून बाहेर पडावे असे वाटत असेल तर…!

 

 

Exit mobile version