Site icon HW News Marathi

मराठा आरक्षणावरून तानाजी सावंतांचे वादग्रस्त वक्तव्य; मराठा क्रांती मोर्चाकडून संताप

मुंबई | नेहमी वादग्रस्त विधानामुळे चर्चे राहणारे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी मराठा आरक्षणावरून (maratha reservation) वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मराठा क्रांती मोर्चाने संताप व्यक्त केला असून सावंतांनी त्यांच्या वक्तव्यावर माफी मागावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे. “आत्ताच मराठा आरक्षणाच्या विषयाची खाज का निर्माण झाली?,” असा सवाल करत तानाजी सावंत यांनी केला आहे.

 

तानाजी सावंत म्हणाले, “यापूर्वी मराठा आरक्षण हे दुट्टपी राजकारणात अडकलेले होते. मात्र, आमच्या काळात मराठा समाजाला आरक्षण मिळणारच. परंतु, मराठा आरक्षणाचा विषय आत्ताच बाहेर काढून वातावरण खराब करण्याना आपण ओळखले पाहिजे. तुम्ही इतके दिवस गप्प का होतात? आत्ताच मराठा आरक्षणाच्या विषयाची खाज का निर्माण झाली?”, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तानाजी सावंतांनी काल (25 सप्टेंबर) उस्मानाबादमध्ये हिंदूगर्वगर्जना संवाद यात्रेदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य केले.

 

आम्ही सर्व सामान्ये मराठे काही कुणी तुमच्या विरोधकांनी सोडलेली पिलावळ नाही, अशा शब्दात मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक योगेश केदार यांनी तानाजी सावंतच्या वादग्रस्त व्यक्तव्याचा समाचार घेतला. आणि तानाजी सावंतांनी मराठा समाजाची माफी मागावी, अशी मागणी योगेश केदार यांनी केली आहे.

 

 

 

 

 

Exit mobile version