Site icon HW News Marathi

अखेर आदित्य ठाकरेंच्या सिल्लोडमधील सभेला मिळाली परवानगी

मुंबई | माजी मंत्री आणि शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या सभेला परवानगी दिली आहे. आता आदित्या ठाकरेंची सभा ही सिल्लोडमधील आंबेडकरचौकाजवळील मोकळ्या मैदानात सभा होणार आहे. औरंगाबाद ग्रामीण पोलिसांकडून आदित्य ठाकरेच्या सभेला परवानगी दिली आहे.  यापूर्वी पोलिसांनी यांची सोमवारी सिल्लोडमध्ये होणाऱ्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली होती.कारण सिल्लोडमध्ये सोमवारी (7 नोव्हेंबर) आदित्य ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांची देखील सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंच्या सभेला परवानगी नाकारल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु, अखेर सांयकाळीपर्यंत औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी आदित्य ठाकरेंच्या सबेला परवानगी दिली.

दरम्यान,  सिल्लोडमध्ये होणाऱ्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. सिल्लोड हा शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांचा मतादरसंघ आहे.  परंतु, श्रीकांत शिंदे यांच्या सभेला परवानगी आहे. तर आदित्य ठाकरेंच्या सभेला पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत परवानगी नाकारली होती. यापूर्वी आदित्य ठाकरेंची सभा ही महावीर चौकामध्ये होणार होती. तर श्रीकांत शिंदे यांच्या सभेची सभा ही जिल्हा परिषदेच्या मैदानात होणार आहे. आणि श्रीकांत शिंदेच्या सभेला पोलिसांनी परवानगी दिली आहे. आता  आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदे या दोन्ही नेत्यांच्या सोमवारी  सिल्लोडमध्ये सभा होणार आहे. यामुळे दोन्ही नेते काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

यापूर्वी पोलिसांनी आदित्य ठाकरेंच्या सभेसाठी जी जागा दिली होती. त्या जागे ऐवजी दुसऱ्या दोन जागा सूचवल्या होत्या. त्या ठिकाणी आदित्य ठाकरेंना सभा घेण्यास परवानगी दिली जाईल, तसे पोलिसांनी ठाकरे गटाला सूचविले होते. त्यानुसार, ठाकरे गटांनी सिल्लोडमधील आंबेडकर चौकाजवळी मोकळ्या जागाचा पर्याय दिला होता. यानंतर अखेर पोलिसांनी  आंबेडकर चौकाजवळी मोकळ्या जागेला परवानगी दिली.

 

Exit mobile version