Site icon HW News Marathi

“झोपलेलं सरकार जागं होऊ दे…”; ‘मविआ’चे आमदार सरकारविरोधात आक्रमक

मुंबई | राज्यात अवकाळी पाऊसाने (Unseasonal Rains) शेतीचे मोठे नुकसाना झाले आहे. मुंबई, उपनगर, नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीमध्ये देखील अवकाळी पाऊसाचा फटका बसलेला पाहायला मिळाला. मुंबईची लाईफ असणारी लोकल ट्रेनचा वेग देखील मंदावला. तर दुसऱ्या बाजूला राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुरू आहे. अर्थसंल्पीय अधिवेशनात (Maharashtra Budget Session) सत्ताधारी आणि विरोधकांची पावसामुळे तारांबळ उडाली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा (21 मार्च) पंधरावा दिवस असून महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्‍यांवर उतरत जोरदार निदर्शने केली.

 

दरम्यान, राज्य सरकारने अवकाळी पाऊसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत जाहीर करण्याची मागणी केली. यासाठी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकार विरोधात घोषणाबाजी देत आंदोलन केले.  दरम्यान, विरोधकांनी हाता गुढीची प्रतिकृती घेऊन सरकार विरोधात आंदोलन करत घोषणाबाजी केली.

 

झोपलेले सरकार जागे होऊ दे, जनतेचा पाडवा गोड होऊ दे…बळीराजाला मदत करा नाहीतर खुर्च्या खाली करा…ईडा पिडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे… उद्योग चालले बाहेर, वाढती बेरोजगारी… सरकारा गुढी घरी उभारु का शेजारी?… वाढवला गॅस, महागाई केवढी… अवकाळी पाऊस, विस्कटली घडी… सरकारा कशी करु खरेदी? कशी उभारु गुढी?… अशा घोषणा देत आणि बॅनर फडकवून व हातात गुढी घेऊन महागाई, अवकाळी पाऊस, या विषयावर महाविकास आघाडीच्या आमदारांनी सरकार विरोधात हल्लाबोल केला.

 

Exit mobile version