Site icon HW News Marathi

राज्यातील सत्तांतरावर 1 नोव्हेंबरला होणार सुनावणी

मुंबई | महाराष्ट्रातील (Maharashtra) सत्तांतरावर 1 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात अपात्रता आणि इतर मुद्यांवर सुनावणी होणार आहे. न्यायालयात काल (27 सप्टेंबर) पार सुनावणीत खरी शिवसेना (Shiv Sena) कुणाची आणि शिवसेनेचा ‘धनुष्यबाण’ या पक्षचिन्ह कुणाला मिळणार, यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोग (Central Election Commission) निर्णय घेण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना न्यायालयाकडून मोठा धक्का तर शिंदे गटाला दिलासा मिळाला आहे. तर आता 1 नोव्हेंबरला होणाऱ्या सुनावणी होणार असल्यामुळे एक महिनाभर राज्यातील सत्तांतर सुनावणी लांबणीवर गेली आहे.

दरम्यान, नवरात्रीची नऊ दिवसांची सुट्टी आली असून ऑक्टोबर महिन्यात दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे न्यायालयाचे कामकाज पुढे ढकलले आहे. यामुळे आता राज्यातील सत्तांतरावर 1 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. तर शिवसेना कुणाची आणि पक्ष चिन्हासंदर्भात आता निवडणूक आयोगा निर्णय देणार असल्याचे न्यायालयाने कालच स्पष्ट केले आहे. न्यायालयात काल पार पडलेल्या सुनावणीचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या 40 आमदारांसह 12 खासदारांनी बंडखोरी केली. यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार सोडल्यानंतर शिंदेंनी भाजपशी हात मिळवणी करत राज्यात सरकार स्थानप केले. यातापर्यंत तीन बेंचकडे राज्याचे सत्तांतर प्रकरण गेले आहे. सुरुवातीच्या काळात व्हेकेशन बेंचकडे या प्रकरणाची सुनावणी झाली. यानंतर तत्कालीन सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या बेंचकडे यावर सुनावणी सुरू झाली.  यानंतर न्यायालयात काल न्यायमूर्तीं धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायमुर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी पार पडली. यात चंद्रचूड यांच्यासह न्यायमूर्तीं एम.आर. शहा, न्यायमूर्तीं कृष्ण मुरारी, न्यायमूर्तीं हिमाकोहली आणि न्यायमूर्तीं पी. नरसिंहा यांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या

शिंदे गटाला घटनापीठाचा मोठा दिलासा! पक्षचिन्हाबद्दलचा निर्णय निवडणूक आयोग घेणार

 

 

Exit mobile version