Site icon HW News Marathi

सुधीर तांबेंनी उमेदवारी अर्ज न भरल्यामुळे काँग्रेसकडून शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता

मुंबई | नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसने काँग्रेसने दिलेला अधिकृत उमेदवारी डॉ. सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe) यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. तर डॉ. सधीर यांचे चिरंजीव सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. यामुळे काँग्रेस पक्षाकडून पिता-पुत्रांवर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकारामुळे अहमदनगरमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात विरूद्ध डॉ. सुधीर तांबे असा संघर्षची ढिंगणी आज (12 जानेवारी) राज्याच्या राजकारणात पाहायला मिळाली आहे. आता बाळासाहेब थोरात या प्रकारावर काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काँग्रेसकडून सुधीर तांबे यांनी तीन वेळा निवडणूक लढवली आहे. आणि कांग्रेसकडून त्यांना चौथ्यांदा निवडणूक लढणार होते. परंतु, सुधीर तांबेंनी पक्षाला कोणतीही कल्पना न देता त्यांनी अर्ज न भरण्याचा निर्णय घेतला. आणि सुधीर तांबेंनी पक्षाला उमेदवारी मागे घेण्यासंदर्भात न विचारता परस्पर उमेदवारी मागे घेतली. यामुळे तांबे पिता-पुत्रांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अहमदनगर जिल्ह्यात बाळासाहेब थोरात हा काँग्रेसचा प्रमुख चेहरा म्हणून ओळखला जातो. काँग्रेस पक्षाने सधीर तांबे यांना उमेदवारी देऊनही अर्ज न भरल्यामुळे त्यांच्यावर पक्षीय शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सत्यजीत ताबे यांनी 2014 मध्ये विधानसभेची निवडणूक लढविली होती. परंतु, या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. संगमनेरमध्ये थोरात निवडून येतात. यामुळे थोरात जे उमेदवार देणात तोच निवडून येतो. या पारश्वभूमीवर तांबे पिता-पुत्रांनी थोरांना काही कळू न देता.  काँग्रेसच्या अधिकृत सुधीर तांबेंनी फॉर्म न भरला नाही. तर सुधीर तांबे यांचे चिरंजीव सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. तरी मी काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचेही त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले.

संबंधित बातम्या

नाशिक पदवीधर मतदारसंघात ‘या’ तांबेंनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज; राजकारणात एकच खळबळ

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेसकडून सुधीर तांबे यांच्या नावाची घोषणा

Exit mobile version