HW News Marathi
राजकारण

काँग्रेसकडून ‘भाजपचा शिशुपाल मोदींच्या १०० चुका’ या पुस्तिकेचे प्रकाशन

मुंबई | काँग्रेसने भाजपच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या चुकाच्या कारभाराचा पंचनामा करणाऱ्या ‘भाजपचा शिशुपाल मोदींच्या १०० चुका’या पुस्तिकेचे प्रकाशन काल (३० मार्च) केले आहे. याबरोबरच लोकसभा निवडणुकीसाठी प्रदेश काँग्रेसच्या कंट्रोल रूमचे उद्घाटन काल मुंबईच्या टिळक भवन येथे करण्यात आले आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी काँग्रेसमध्ये काल प्रवेश केला. गायकवाड यांना काँग्रेसच्या तिकीटावर पुण्यातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. गायकवाड त्यांच्या समर्थकांसह मुंबईमध्ये दाखल झाले आहेत.

रावेरची जागा राष्ट्रवादीने काँग्रेसला सोडल्याने पुण्याची जागा राष्ट्रवादीला येईल, अशी चर्चा काल (२९ मार्च) पुण्यात रंगली होती. तसेच झाल्यास राष्ट्रवादीकडून प्रवीण गायकवाड यांना पुण्यातून उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पुस्तिकाच्या प्रकाशन वेळी महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, निरीक्षक मधुसुदन मिस्त्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, आदी काँग्रेसचे नेते उपस्थित होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मार्चच्या पहिल्याच आठवड्यात लोकसभा निवडणुकाची घोषणा ?

News Desk

कर्नाटकात येडियुरप्पा आज सत्ता स्थापनेचा दावा करणार

News Desk

बुजुर्ग आडवाणी यांचा अपमान झाल्याची छाती पिटण्याची निदान काँग्रेसला गरज नाही !

News Desk