Site icon HW News Marathi

कोल्हापूर जिल्ह्यातील 19 ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर; 12 ग्रामपंचायतीमध्ये भाजपचा बोलबाला

मुंबई | राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या (Panchayat Election Result) सार्वत्रिक निवडणुकांचा आज निकाल लागण्यास सुरुवात झाली. या निवडणुकीचा आज (20 डिसेंबर) मतमोजणीला सुरुवात झाली असून यात कोल्हापूर जिल्ह्यातील 429 ग्रामपंचायतीपैकी 19 चे निकाल हाती आले आहे. यात 12 ग्रामपंचायतीमध्ये भाजप शिंदे गटाने बोलबाला आहे. तर शिरोळ तालुक्यामध्ये शिंदे गटाने 4 ग्रामपंचायतींवर विजय मिळविला आहे.

 

तसेच आजरात तालुक्यातील सरबळवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसला विजय मिळाला आहे. कोल्हापूर शहातील वेशीवरील गावांमध्ये निकवडणुकीच्या निकालाची उत्सहा दिसून येत आहे. कोल्हापूरातील पाचगाव, उचगाव, कळंबा, वडणगे  आणि मोरेवाडी या गांवाच्या निवडणुकीत भाजपचे खासदार धनंजय महाडिक आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या स्पर्धा लागली असून या गावांत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हा व तालुकानिहाय संख्या : 

अहमदनगर- 203, अकोला- 266, अमरावती- 257, औरंगाबाद- 219, बीड- 704, भंडारा- 363, बुलडाणा- 279, चंद्रपूर- 59, धुळे- 128, गडचिरोली- 27, गोंदिया- 348, हिंगोली- 62, जळगाव- 140, जालना- 266, कोल्हापूर- 475, लातूर- 351, नागपूर- 237, नंदुरबार- 123, उस्मानाबाद- 166, पालघर- 63, परभणी- 128, पुणे- 221, रायगड- 240, रत्नागिरी- 222, सांगली- 452, सातारा- 319, सिंधुदूर्ग- 325, सोलापूर- 189, ठाणे- 42, वर्धा- 113, वाशीम- 287, यवतमाळ- 100, नांदेड- 181 व नाशिक- 196. एकूण- 7,751.

 

Exit mobile version