Site icon HW News Marathi

“दसरा मेळावा घ्यायचा अधिकार हा आमचा”, शिंदे गटाचा दावा

मुंबई | एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हात मिळवणी करत सरकार स्थापन केले. यात शिंदे राज्याचे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले आहे. शिंदे गटाने पक्षासोबत बंडखोरीत वेगळा गट स्थापन केला. शिंदे गटाने सुरुवातीपासून आपण शिवसेनेमध्येच असल्याचा दावा केला आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून दसरा मेळावा (dasara melava) हा महत्वाचा मानला आला जातो. आता शिंदे गट आणि शिवसेना या दोघांमध्ये दसऱ्या मेळाव्यावरून रस्सीखेच पाहायला मिळत आहे. यामुळे यंदाचा दसरा मेळावा? नेमका कोणाचा यावर राज्याच्या राजकारणात चर्चा सुरू झाल्या आहेत.

शिंदे गटाने शिवसेनेच्या धनुष्यबाण हे चिन्हे आमचेच अशी भूमिका घेतली असून शिंदे गटाची शिवसेना ही खरी शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाने सुरुवातीपासून केला आहे. सध्या हे दोन्ही प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. शिंदे गटाने दसरा मेळावा हा शिंदे गटाचे असल्याच दावा केला, शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केले आहे. यासंदर्भात म्हस्के यांनी मोठे विधान केले आहे. यामुळे आता दसरा मेळाव्यावरून दोन्ही पक्षाचे राजकारण तापले आहे.

म्हस्के म्हणाले, “दसरा मेळावा घ्यायचा अधिकार हा आमचा आहे. आम्ही हिंदुत्ववादी विचारसरणीचे आहोत. कारण दसरा मेळावा हा हिंदुत्ववादी विचारसरणीचा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील, हे तुम्हाला कळेल,” असे म्हणत त्यांनी दसऱ्या मेळाव्यावर शिंदे गटाने दावा केला आहे. म्हस्के पुढे म्हणाले, “हिंदुत्ववादी विचारसरणीचे विचार सोडलेले दसरा मेळाव्यावर दावा सांग आहेत. यामुळे आता आता कोणता अधिकार आहे तो मेळावा करण्याचा?,” असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

 

 

 

 

Exit mobile version