HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा १७ ऑगस्टला होणार सुरुवात

मुंबई। महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजानादेश यात्रा थांबविली होती. परंतु आता या दोन्ही जिल्ह्यातील पुरीचे पाणी ओसल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा   १७ ऑगस्टपासून होणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्र्यांनी महाजानादेश यात्रा काढली होती. मात्र ही यात्रा कोल्हापूर आणि सांगलीत आलेल्या पूराच्या संकटामुळे स्थगित करण्यात आली होती. आता या दोन्ही जिल्ह्यावरची महापूराचे संकट टळले आहे. त्यामुळे त्यासाठीचे नियोजन सुरू झाले आहे. आता दुसऱ्या टप्प्यात नगर आणि मराठवाड्यातून यात्रा सुरू होणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात १८ ऑगस्ट रोजी यात्रा नगर जिल्ह्यात येणार आहे. १८ रोजी त्यांच्या अकोले व संगमनेरला सभा होणार असून, याच दिवशी राहुरी व नगरला स्वागत समारंभ होणार आहेत व १९ रोजी पाथर्डी, आष्टी व जामखेड येथे सभा घेऊन फडणवीस बीडकडे जाणार आहेत. भाजपकडून या यात्रेची जोरदार तयारी सुरू झाली आहे. या दुसऱ्या टप्प्यात यात्रा ९३ विधानसभा मतदारसंघांत २,७४५ किलोमीटर एवढा प्रवास करणार आहे.

Related posts

कर्नाटकातील कुमारस्वामी सरकारच्या अग्निपरीक्षेला सुरुवात

News Desk

तासगावात चिकनगुनियाची साथ, नगरपालिकेचे मात्र दुर्लक्ष  

News Desk

‘बेस्ट’ला आर्थिक बळकटी देण्यासाठी तिकीट स्वस्त

News Desk