Site icon HW News Marathi

निवडणूक आयोगासमोर शिवसेना आणि धनुष्यबाणावर होणार सुनावणी

मुंबई | राज्यात संत्तातरवर झाल्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले. यात शिंदे गट आणि ठाकरे गट, असे दोन गट पडले आहेत. यानंतर दोन्ही गटाने शिवसेना आणि पक्षाचे चिन्ह धन्युष्यबाणावर दावा केला. राज्याच्या संत्तातरावर आज (10 जानेवारी) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी पार पडली. यानुसार, आता राज्याच्या संत्तातरावर पुढील सुनावणी ही 14 फेब्रुवारीला होणार आहे. यानंतर आता  निवडणूक आयोगाचीही (Election Commission Of India) आज दुपारी ही सुनावणी होणार आहे. यामुळे आता निवडणूक आयोग शिवसेना आणि धनुष्यबाण पक्षाचे चिन्ह काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

 

दरम्यान, ठाकरे गटाकडे जास्त सदस्य प्रतिज्ञापत्र आहे, असा दावा ठाकरे गटाचे वकील सनी जैन यांनी हा दावा केला आहे. ठाकरे गटाकडे 22 लाख 24 हजार सदस्यांची प्रतिज्ञापत्र असल्याचे जैन यांनी म्हटले आहे. तर शिंदे गटाकडे 4 लाख 51 हजार सदस्यांची प्रतिज्ञापत्र आहे. शिंदेपेक्षा ठाकरे गटाकडे साडे 15 लाख अधिक प्रतिज्ञापत्र आहेत, असा दावा जैन यांनी केलेला आहे.

 

 न्यायालयात नेमके काय झाले

राज्यातील सत्तांतरावर पुढील सुनावणी 14 फेब्रुवारीला होणार आहे. येत्या 14 फेब्रुवारीला होणाऱ्या सुनावणीदरम्यान  राज्यातील सत्तांतरावर प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे जाणार की नाही, यासंदर्भात कोणतीही टिप्पणी केलेली नाही. या प्रकरणावर न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाली होती. तेव्हा ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी नबाम रेबिया केसवर काही वादविवाद करायचे आहे, असे न्यायालयात म्हटले. आणि हे प्रकरण 7 न्यायमूर्तीच्या पीठाकडे का?, जावे, यासंदर्भातील मुद्दे मांडायचे आहेत, असे कपिल सिब्बल यांनी न्यायालया सुनावणीदरम्यान म्हटले.  तसेच शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांनी देखील न्यायालयात म्हटले की, हे प्रकरण पुढे किती वेळी चालू ठेवायचे यासंदर्भात तातडीने विचार करावा. यावर सर न्यायाधीश चंद्रचूड म्हणाले, “14 फेब्रुवारीला आम्ही महाराष्ट्राच्या सत्तांतरावर सुनावणी घेऊ.”

Exit mobile version